IND vs WI 2nd ODI Live Marathi : रोहित शर्मा व विराट कोहली या दोन स्टार खेळाडूंशिवाय मैदानावर उतरलेला भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची तयारी करण्याची भारतासमोरील ही अखेरची संधी आहे, परंतु यातही संघ व्यवस्थापन प्रयोग करताना दिसत आहेत. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित यांचा हाच प्रयोग भारताच्या अंगलट येताना दिसतोय.. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करताना भारताचा निम्मा संघ २४.१ षटकांत माघारी पाठवला आहे.
भारताचे ३ फलंदाज ७ धावांत माघारी परतले; Rahul Dravidच्या डावपेचावर चाहते संतापले
नाणेफेकीसाठी रोहितएवजी हार्दिक पांड्या आला आणि रोहित शर्मा व विराट कोहली यांना विश्रांती दिली गेली आहे. संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांना संधी दिली गेली आहे. त्यामुळे आजही इशान किशन व शुबमन गिल ही जोडी सलामीला खेळताना दिसली आणि त्यांनी ९० धावांची भागीदारी केली. पण, त्यानंतर भारताचा डाव गडगडला. इशान किशनने ५१ चेंडूंत वन डे क्रिकेटमधील पाचवे अर्धशतक झळकावले. गिलही आक्रमक खेळ करायला गेला, परंतु तो ३४ धावांवर झेलबाद झाला. पुढच्याच षटकात इशान ( ५५) बाद झाला. चौथ्या क्रमांकावर आलेला अक्षर पटेल ( १) झेलबाद झाला.
हार्दिक पांड्या व संजू सॅमसन सावध खेळत होते, परंतु जेडन सील्स गोलंदाजीवर परतला अन् त्याने हार्दिकची ( ७) विकेट मिळवून दिली. संजू सॅमसन ( ९) अपयशी ठरला अन् यानिक कारियाच्या अप्रतिम फिरकी चेंडूवर त्याला झेल देण्यास भाग पाडले आणि बिनबाद ९० वरून भारताताचा ११३ धावांत निम्मा संघ माघारी परतला. पावसामुळे सामना थांबला आहे.