Join us  

IND vs WI, 2nd ODI  Live Updates : एक बदलासह भारतीय संघ आज वेस्ट इंडिजचा सामना करणार; यजमान नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला येणार 

शिखर धवन, शुबमन गिल, श्रेयस अय्यर या आघाडीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिल्यानंतर भारताची मधली फळी ढेपाळली. त्यामुळे दुसऱ्या वन डेत  संजू सॅमसन, दीपक हुडा,  सूर्यकुमार यादव यांच्यावर सर्वांचे लक्ष असणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 6:38 PM

Open in App

India vs West Indies, 2nd ODI  Live Updates : वेस्ट इंडिजने पहिल्या वन डे सामन्यात भारताला कडवी टक्कर दिली. नशीब बाजूने होते म्हणून भारताने पहिला सामना ३ धावांनी जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. शिखर धवन, शुबमन गिल, श्रेयस अय्यर या आघाडीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिल्यानंतर भारताची मधली फळी ढेपाळली. त्यामुळे दुसऱ्या वन डेत  संजू सॅमसन, दीपक हुडा,  सूर्यकुमार यादव यांच्यावर सर्वांचे लक्ष असणार आहे. रवींद्र जडेजा आजच्या सामन्यातही खेळणार नसल्याचे अक्षर पटेल संघात कायम असेल, परंतु पहिल्या सामन्यात तो दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेलेला दिसला. त्याने उपचारही घेतले होते. गोलंदाजीत अनुभवाची उणीव जाणवतेय, शार्दूल ठाकूरला आणखी जबाबदारीने मोर्चा सांभाळायला हवा. १९८३ मध्ये भारतीय संघ प्रथम विंडीजमध्ये द्विदेशीय वन डे मालिका खेळला होता आणि यजमानांनी २-१ अशी ती मालिका जिंकली होती. १९८९ ( ५-०), १९९७ ( ३-१) मध्येही विंडीजने बाजी मारली.  २००२मध्ये भारताने २-१ अशा विजयासह विंडीजमध्ये पहिली मालिका जिंकण्याचा पराक्रम केला, परंतु २००६मध्ये त्यांना ४-१ असा पराभव पत्करावा लागला.  २००९मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली २-१ असा विजय, २०११मध्ये सुरेश रैनाच्या कर्णधारपदाखाली ३-२ असा विजय, २०१७ व २०१९ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अनुक्रमे ३-१  व २-० असा विजय टीम इंडियाने मिळवला आहे. आजचा स सामना जिंकल्यास भारत वन डे मालिकेवर कब्जा करेल आणि कर्णधार शिखर धवन या पंक्तित स्थान पटकावेल.

cजलदगती गोलंदाज आवेश खान ( Avesh Khan) आज पदार्पण करणार आहे. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रसिद्ध कृष्णाला आज विश्रांती देण्यात आली आहे. शिखर धवन, शुबमन गिल,  श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू  सॅमसन, दीपक हुडा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज व आवेश खान असा  संघ आहे.  

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजवेस्ट इंडिज
Open in App