Join us  

Sanju Samson, IND vs WI, 2nd ODI Live Updates : संजू सॅमसनच्या 'क्लास' खेळीचा दुर्दैवी शेवट; विंडीजच्या खेळाडूच्या हातून निसटला चेंडू तरी झाला बाद, Video 

Sanju Samson, IND vs WI, 2nd ODI Live Updates : संजू सॅमसन व श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer ) यांनी चौथ्या विकेटसाठी ९९ धावा जोडल्या. श्रेयसने वन डेतील ११ वे अर्धशतक झळकावले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 8:10 AM

Open in App

India vs West Indies, 2nd ODI Live Updates : ३१२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची अवस्था ३ बाद ७९ धावा अशी झाली होती. पण, संजू सॅमसनश्रेयस अय्यर ( Shreyas Iyer ) यांनी चौथ्या विकेटसाठी ९९ धावा जोडल्या. श्रेयसने वन डेतील ११ वे अर्धशतक झळकावले, परंतु चुकीच्या निर्णयाचा त्याला फटका बसला. संजूनेही वन डेतील पहिले अर्धशतक झळकावताना भारताच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या, पंरतु त्याच्या क्लास खेळीचा दुर्दैवी शेवट झाला.  शिखर धवन ( १३), सूर्यकुमार यादव (९) व शुबमन गिल ( ४३) हे ७९ धावांवर माघारी परतले. कायले मेयर्सने दोन विकेट्स घेतल्या.   संजू सॅमसनश्रेयस अय्यर या जोडीने संयमी खेळ करताना आधी खेळपट्टीवर स्वतःला सेट केले. संजूचे नशीब आज चांगले होते, दुसऱ्या चेंडूवर त्याचा झेल सुटला अन् LBW साठी विंडीजनं DRS न घेतल्याने संजू पुन्हा वाचला. श्रेयसने ५७ चेंडूंत ११वे अर्धशतक पूर्ण केले. संजू-श्रेयस यांची ९४ चेंडूंत ९९ धावांची भागीदारी अल्झारी जोसेफने संपुष्टात आणली. श्रेयस ७१ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ६३ धावांवर बाद झाला. 

संजूने ४७ चेंडूंत वन डे तील पहिले अर्धशतक पूर्ण केले. ३९व्या षटकात संजूची दुर्दैवी विकेट पडली. शेफर्डच्या गोलंदाजीवर एक धाव घेण्यासाठी नॉन स्ट्रायकर एंडवरून दीपक हुडाने कॉल दिला. हुडा दुसऱ्या बाजूला सहज पोहोचला, परंतु मेयर्सने नॉन स्ट्रायकर एंडला जाणाऱ्या संजूच्या दिशेने चेंडू फेकला. शेफर्डच्या पायाला लागून चेंडू यष्टींवर आदळला अन् संजूला ५४ धावांवर माघारी जावे लागले. त्याने ३ चौकार व ३ षटकार खेचले.  

दरम्यान, टीम इंडियाने हा सामना २ विकेट्स राखून जिंकताना मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. शुबमन गिल ( ४३), संजू सॅमसन ( ५४), श्रेयस अय्यर ( ६३) व दीपक हुडा ( ३३) यांनी दमदार खेळ केला. अक्षर पटेलच्या झंझावातासमोर विंडीजचा पालापाचोळा झाला. अक्षरने ३५ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकार खेचून नाबाद ६४ धावा करताना भारताला २ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजसंजू सॅमसनश्रेयस अय्यर
Open in App