Rohit Sharma DRS, IND vs WI, 2nd ODI Live Updates : रोहित शर्माता आता 'DRS' नाव बदलूनच ऐकणार, सुनील गावस्करांनी केलेलं बारसं योग्य ठरणार

India vs West Indies, 2nd ODI Live Updates : दुसऱ्या वन डे सामन्यात भारतीय संघाची आघाडीची व तळाची फळी अपयशी ठरली. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना भारताला ९ बाद २३७ धावांपर्यंतच मजल मारू दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 07:10 PM2022-02-09T19:10:02+5:302022-02-09T19:10:31+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI, 2nd ODI Live Updates : Excellent DRS taken by Rohit Sharma, convinced by Rishabh Pant, Prasidh Krishna gets his 2nd wicket in 7 balls | Rohit Sharma DRS, IND vs WI, 2nd ODI Live Updates : रोहित शर्माता आता 'DRS' नाव बदलूनच ऐकणार, सुनील गावस्करांनी केलेलं बारसं योग्य ठरणार

Rohit Sharma DRS, IND vs WI, 2nd ODI Live Updates : रोहित शर्माता आता 'DRS' नाव बदलूनच ऐकणार, सुनील गावस्करांनी केलेलं बारसं योग्य ठरणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies, 2nd ODI Live Updates : दुसऱ्या वन डे सामन्यात भारतीय संघाची आघाडीची व तळाची फळी अपयशी ठरली. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना भारताला ९ बाद २३७ धावांपर्यंतच मजल मारू दिली. लोकेश राहुल ( ४९) व सूर्यकुमार यादव (  ६४) यांनी मधल्या फळीत डाव सावरल्यामुळे इथपर्यंत यजमानांना पोहोचता आले. प्रत्युत्तरात, वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली होती, परंतु प्रसिद्ध कृष्णाने ( Prasidh Krishna ) ७ चेंडूत त्यांचे दोन फलंदाज माघारी पाठवले. यात पुन्हा एकदा रोहित शर्माचा DRS घेण्याचा निर्णय योग्य ठरला. यावेळेस कर्णधार रोहितनं यष्टिरक्षक रिषभ पंतचे ऐकले आणि सलग दोन सामन्यांत त्याचा चौथा DRS चा निर्णय अचूक ठरला. 


नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. रोहित शर्मा ( ५) व रिषभ पंत ( १८) सलामीला आले, परंतु हा डाव फसला. १२व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रिषभने ( १८) उत्तुंग फटका मारला, परंतु जेसन होल्डरने धाव घेत सुरेख झेल टिपला. त्यानंतर  ओडीन स्मिथने पुढील चार चेंडू  वेगवेगळ्या प्रकारे फेकले आणि सहाव्या चेंडूवर विराटची ( १८)  विकेट घेतली. भारताच्या १२ षटकांत ३ बाद ४३ धावा झाल्या होत्या. लोकेश राहुल व सूर्यकुमार यादव यांनी सावध खेळ करताना चौथ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी केली.

लोकेश ४८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४९ धावांवर स्वतःच्या चूकीमुळे रनआऊट झाला. सूर्यकुमारने ८३ चेंडूंत ५ चौकारांसह ६४ धावा केल्या. सूर्याने ६व्या विकेटसाठी वॉशिंग्टन सुंदरसह ४३ धावा जोडल्या. दीपक हुडाने अखेरच्या षटकांत चांगली खेळी करताना भारताला समाधानकारक पल्ला गाठून दिला. हुडा २५ चेंडूंत २९ धावांवर बाद झाला. भारताला ५० षटकांत ९ बाद २३७ धावा करता आल्या. 

लक्ष्याचा पाठलाग करताना  शे होप आणि ब्रेंडन किंग यांनी सावध सुरुवात केली. पण, ८व्या षटकात कर्णधार रोहितने प्रसिद्ध कृष्णाला गोलंदाजीला बोलावले. ८व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने किंगला ( १८) यष्टिरक्षक रिषभकरवी झेलबाद केले. त्यानंतर १०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर डॅरेन ब्राव्हो ( १) बाद झाला. मैदानावरील अम्पायरने ब्राव्होला नाबाद दिले होते. पण, रिषभ प प्रसिद्धने कॅचसाठी जोरदार अपील केले. रिषभने राजी केल्यानंतर रोहितने DRS घेतला आणि त्यात बॅट पॅडलला नाही तर चेंडूला लागण्याचे दिसले आणि ब्राव्होला माघारी जावे लागले.


सलग चार DRS यशस्वी
पहिल्या वन डे सामन्यात समालोचन करणारे सुनील गावस्कर रोहित शर्माच्या नेतृत्वकौशल्यावर खूश झाले होते. तेव्हा ते म्हणाले होते की,''रोहित शर्माने DRS चे अचूक निर्णय घेतले. याआधी जेव्हा धोनीचे DRS चे अधिक निर्णय योग्य ठरले होते, तेव्हा आपण त्याला Dhoni Review System असे म्हणायचो, आता त्याचं नामांतर करून 'Definitely Rohit System असे करायला हवे.''

Web Title: IND vs WI, 2nd ODI Live Updates : Excellent DRS taken by Rohit Sharma, convinced by Rishabh Pant, Prasidh Krishna gets his 2nd wicket in 7 balls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.