Join us  

Shikhar Dhawan, IND vs WI, 2nd ODI Live Updates : Ohh No! शिखर धवनला जखमी करण्याचा प्रयत्न अन् नंतर अफलातून कॅच घेत मिळवली विकेट, Video 

India vs West Indies, 2nd ODI Live Updates : वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी त्यांची जबाबदारी चोख पार पाडल्यानंतर गोलंदाजांची वेळ होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 7:14 AM

Open in App

India vs West Indies, 2nd ODI Live Updates : वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी त्यांची जबाबदारी चोख पार पाडल्यानंतर गोलंदाजांची वेळ होती. त्यांनीही टिच्चून मारा करताना भारताच्या सलामीच्या जोडीला सावध खेळ करण्यास भाग पाडले होते. शिखर धवन ( Shikhar Dhawan) व शुबमन गिल यांना ११ षटकांत ४८ धावा करता आल्या. ११व्या षटकात ही भागीदारी संपुष्टात आली. रोमारिओ शेफर्डने ११व्या षटकात शॉर्ट बॉलवर धवनला जखमी करण्याचा प्रयत्न केला. शेफर्डने टाकलेला चेंडू धवनच्या हेल्मेटवर इतक्या जोरात आदळला की हेल्मेटमधील गार्ड बाहेर आलं. त्यानंतर पुढील चेंडूवर पुन्हा एक शॉर्ट बॉल टाकला. त्यावर धवनने अपर कट मारला, परंतु डीप थर्ड मॅनला कायले मेयर्सने अफलातून झेल घेतला. धवनला ३१ चेंडूंत १३ धावांवर माघारी जावे लागले. 

१००वा वन डे सामना खेळणाऱ्या शे होपने ( Shai Hope) आज भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पहिल्या सामन्यात झालेली चूक टाळताना त्याने कायले मेयर्स यांनी विंडीजला आश्वासक सुरूवात करून दिली. मेयर्स ३९ धावांवर बाद झाला आणि ६५ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. होप आणि शामार्ह ब्रुक्स ( ३५) यांनी ७४ चेंडूंत ६२ धावांची भागीदारी केली. होपने दमदार वाटचाल सुरू ठेवली होती आणि त्याच्यासोबत कर्णधार निकोलस पूरन खांद्याला खांदा लावून उभा राहिला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ११७ धावा जोडल्या. पूरन ७७ चेंडूंत १ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने ७४ धावांवर त्रिफळाचीत झाला. 

होपने त्यानंतर खणखणीत षटकार खेचून शतक पूर्ण केले. १००व्या वन डे सामन्यात शतक झळकावणारा होप हा जगातील दहावा आणि विंडीजचा चौथा फलंदाज ठरला. याआधी गॉर्डन ग्रिनिज ( १०२* वि. पाकिस्तान, १९८८), ख्रिस गेल ( १३२* वि. इंग्लंड, २००४) आणि रामनरेश  सारवान ( ११५* वि. भारत, २००६) यांनी हा पराक्रम केला आहे. होप १३५ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ११५ धावांवर शार्दूलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. विंडीजने ६ बाद ३११ धावा केल्या. शार्दूलने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. आपल्या ५०व्या आणि १०० व्या वन डे सामन्यात शतक झळकावणारा शे होप हा जगातील एकमेव फलंदाज ठरला. त्याने  ५०व्या सामन्यात आयर्लंडविरुद्ध १७० धावा केल्या होत्या.  

पाहा धवनची विकेट अन् त्याआधीचा डेंजर चेंडू... 

दरम्यान, टीम इंडियाने हा सामना २ विकेट्स राखून जिंकताना मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. शुबमन गिल ( ४३), संजू सॅमसन ( ५४), श्रेयस अय्यर ( ६३) व दीपक हुडा ( ३३) यांनी दमदार खेळ केला. अक्षर पटेलच्या झंझावातासमोर विंडीजचा पालापाचोळा झाला. अक्षरने ३५ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकार खेचून नाबाद ६४ धावा करताना भारताला २ विकेट्स राखून विजय मिळवून दिला

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजशिखर धवनशुभमन गिल
Open in App