Join us  

IND vs WI, 2nd ODI : चल बेटा Selfie ले ले रे! अक्षर पटेलची मॅच विनिंग खेळी अन् टीम इंडियाचं ड्रेसिंग रुममध्ये 'सैराट' सेलिब्रेशन, Video 

India vs West Indies 2nd ODI : भारतीय संघाने तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. विंडीजविरुद्ध भारताचा हा सलग १२ वा मालिका विजय ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 1:58 PM

Open in App

India vs West Indies 2nd ODI : भारतीय संघाने तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. विंडीजविरुद्ध भारताचा हा सलग १२ वा मालिका विजय ठरला. वेस्ट इंडिजला त्यांच्या घरच्या मैदानावर लोळवणारा शिखर धवन हा भारताचा पाचवा कर्णधार ठरला. अक्षर पटेल ( Axar Patel) हा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. ३ चेंडूंत ६ धावांची गरज असताना त्याने खणखणीत षटकार खेचून २ विकेट्स राखून भारताला विजय मिळवून दिला आणि मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. अक्षरने विजयी षटकार खेचल्यानंतर भारतीय खेळाडूंनी एकच जल्लोष केला. Dressing Room मधील सेलिब्रेशन तर भन्नाट होते. राहुल द्रविडही या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाला. 

भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर मात केली, परंतु पाकिस्तानची जीरवली; मोडला त्यांचा विश्वविक्रम

शे होप ( ११७), कर्णधार निकोलस पूरन ( ७४), कायले मेयर्स ( ३९) व शामार्ह ब्रुक्स ( ३५) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने ६ बाद ३११ धावांचा डोंगर उभा केला. पदार्पणवीर आवेश खानची ( ६ षटकांत ५४ धावा) याची चांगली धुलाई झाली. शार्दूल ठाकूरही ( ७ षटकांत ५४ धाव) महागडा ठरला, परंतु त्याने तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. दीपक हुडा, अक्षर पटेल व युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी  विकेट घेतली. लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवन ( १३) व शुबमन गिल ( ४३) यांनी फार संथ सुरुवात केली. त्यात सूर्यकुमार यादवही (९) अपयशी ठरल्यानं भारताची अवस्था ३ बाद ७९ अशी झाली. यावेळेस संजू सॅमसन व श्रेयस अय्यर ही जोडी मैदानावर अडून बसली आणि त्यांनी चौथ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली.

श्रेयस अय्यर ६३ आणि संजू ५४ धावांवर माघारी परतल्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ पुनरागमन करताना दिसला. पण, दीपक हुडा व अक्षर पटेल यांनी अर्धशतकी भागीदारी करून पुन्हा गाडी रुळावर आणली. दीपक ३३ धावांवर बाद झाला. अक्षर पटेलने ३५ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने नाबाद ६४ धावांची खेळी केली. विजयासाठी ६ धावांची गरज असताना त्याने मिड ऑनच्या दिशेने खणखणीत षटकार खेचला अन् भारताने २-० अशी विजयी आघाडी घेतली.  या विक्रमी विजयानंतर भारतीय संघाने ड्रेसिंग रुममध्येही सैराट सेलिब्रेशन केलं..

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजअक्षर पटेलशिखर धवनराहुल द्रविड
Open in App