पुणे: शाय होप आणि अॅश्ले नर्सच्या दमदार कामगिरीच्या जोरावर वेस्ट इंडिजनं तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 43 धावांनी पराभव केला. त्यामुळे वेस्ट इंडिजचं मालिकेतील आव्हान कायम आहे. या विजयामुळे वेस्ट इंडिजनं मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. वेस्ट इंडिजनं भारताला विजयासाठी 284 धावांचं आव्हान दिलं होतं. यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीनं मालिकेतील सलग तिसरं शतक झळकावलं. कोहलीनं एक बाजू लावून धरली असताना दुसऱ्या बाजूनं भारतीय फलंदाज बाद होते. कोहली मैदानात असेपर्यंत भारताच्या आशा जिवंत होत्या. मात्र 42 व्या षटकात कोहली बाद झाला. यानंतर वेस्ट इंडिजनं भारताच्या तळाच्या फलंदाजांना फारशी संधी दिली नाही. भारताचा डाव 240 धावांत आटोपला. वेस्ट इंडिजचा भारतावर 43 धावांनी विजय
भारताला नववा धक्का; खलील बाद
भारताला आठवा धक्का; चहल बाद
विराट कोहली क्लीन बोल्ड; भारताला मोठा धक्का
विराट कोहलीने केले शतकाचे असे सेलिब्रेशन
भारताला सहावा धक्का, भुवनेश्वर कुमार बाद
विराट कोहलीचे दमदार शतक
महेंद्रसिंग धोनी आऊट; भारताला पाचवा धक्का
रिषभ पंत बाद; भारताला चौथा धक्का
अंबाती रायुडू क्लीन बोल्ड; भारताला तिसरा धक्का
कोहलीने केले असे अर्धशतकाचे सेलिब्रेशन
विराट कोहलीने चौकारासह केले अर्धशतक पूर्ण
भारताचे शतक पूर्ण
भारताला दुसरा धक्का, शिखर धवन आऊट
विराट कोहलीने केली चौकाराने सुरुवात
रोहित शर्मा आऊट; भारताला पहिला धक्का
रोहित शर्माने दोन चौकारांसह केली भन्नाट सुरुवात
वेस्ट इंडिजचे भारतापुढे 284 धावांचे आव्हान
वेस्ट इंडिजला मोठा धक्का; शाई होप झाला आऊट
वेस्ट इंडिजला सातवा धक्का; फॅबिअन अलेन आऊट
वेस्ट इंडिजला सहावा धक्का; जेसन होल्डर आऊट
शाई होपला 62 धावांवर कुलदीपने दिले जीवदान
वेस्ट इंडिजच्या शाई होपचे अर्धशतक
वेस्ट इंडिजला पाचवा धक्का, पॉवेल आऊट
हेटमायर आऊट; वेस्ट इंडिजला मोठा धक्का
हेटमायरने षटकार ठोकत साजरे केले वेस्ट इंडिजचे शतक
वेस्ट इंडिजला तिसरा धक्का; 3 बाद 55
वेस्ट इंडिजचे अर्धशतक पूर्ण
वेस्ट इंडिजला दुसरा धक्का, पॉवेल आऊट
महेंद्रसिंग धोनीने पकडलेल्या नेत्रदीपक झेलचा व्हिडीओ पाहा
महेंद्रसिंग धोनीचा अफलातून कॅच, हेमराज बाद
वेस्ट इंडिज 5 षटकांत बिनबाद 15
बुमराचा भेदक मारा; दोन षटकांत दिली फक्त एक धाव
पुणे, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा यांना संघात स्थान देण्यात आले आहे.भारतीय संघ
भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले
भारतीय संघाने केला असा सराव