IND vs WI 2nd T20 Updates: भारताने वेस्ट इंडिजच्या संघाविरूद्धचा पहिला सामना गमावला. आता रविवारी वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात जेव्हा भारतीय संघ मैदानात उतरेल, तेव्हा IPL स्टार्सना आपली चमक दाखवावी लागणार आहे. तरोबा येथे झालेल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने चार धावांनी विजय मिळवला. या वर्षी होणाऱ्या वन डे विश्वचषकाच्या दृष्टीने या टी-२० मालिकेला फारसे महत्त्व नाही. पण कर्णधार हार्दिक पांड्या आणि उपकर्णधार सूर्यकुमार यादव यांना वैयक्तिक आणि संघ म्हणून चांगली कामगिरी करायची आहे. त्यासाठी त्यांना एक महत्त्वाची चूक सुधारावी लागणार आहे.
संघाची फलंदाजी सुधारावी लागणार!
इशान किशन, शुभमन गिल आणि संजू सॅमसन यांची नजर सध्या वन डे विश्वचषकावर आहे. आशिया चषकापूर्वी काही चांगल्या खेळी खेळून त्यांना आत्मविश्वास मिळवायचा आहे. आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा तिलक वर्मा (22 चेंडूत 39) वगळता भारताचा एकही आयपीएल स्टार पहिल्या सामन्यात प्रभावित करू शकला नाही. नऊ दिवसांत तीन देशांमध्ये (त्रिनिदाद आणि टोबॅगो, गयाना आणि अमेरिका) पाच टी-२० सामने खेळवले जाणार आहेत, त्यामुळे हार्दिक, गिल, इशान, फिरकीपटू कुलदीप यादव यांनाही पुरेशी विश्रांती मिळणे आवश्यक आहे. सूर्यकुमार यादवला भारतासाठी मोठी खेळी खेळण्याची गरज आहे. त्याच वेळी, सॅमसन आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच्या प्रतिभेला न्याय देऊ शकलेला नाही. तसेच टी-20 संघात युवा खेळाडू असूनही एवढा प्रवास करणे आणि विश्रांतीशिवाय उसळत्या खेळपट्ट्यांवर सतत खेळणे भरलेच त्रासदायक असणार आहे.
२०२४ मध्ये टी-२० विश्वचषक या देशात खेळवला जाणार
पुढील वर्षी, T20 विश्वचषक वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहे, त्यामुळे या मालिकेने भारताला टी२० मधील पर्याय शोधण्याची संधी दिली आहे. अशा परिस्थितीत आयपीएल स्टार यशस्वी जैस्वाललाही संधी दिली जाऊ शकते. फलंदाजीत चांगली कामगिरी करण्याला भारताचे प्राधान्य असेल. या मैदानावर खेळल्या गेलेल्या 11 टी-20 सामन्यांपैकी तीन पावसाने रद्द झाले, तर यजमानांनी आठपैकी पाच सामने गमावले होते.
भारताचा संघ: हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन, शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार
वेस्ट इंडिज: रोव्हमन पॉवेल (कर्णधार), काइल मायर्स, जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकिल हुसैन, अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग, ओबेद मॅककॉय, निकोलस पूरन, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, ओशान थॉमस.
Web Title: IND vs WI 2nd T20 Hardik Pandya led team India need to improve batting Samson Suryakumar Ishan gill
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.