कोलकाता, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताचा कर्णधार रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात तडफदार फलंदाजी केली. या सामन्यात शतक झळकावताना रोहितने दोन विक्रमानांही गवसणी घातली. भारताकडून सर्वाधिक धावा करताना रोहितने विराट कोहलीला मागे टाकले. त्याचबरोबर क्रिकेट जगतामध्ये सर्वात जास्त शतक झळकावण्याचा विश्वविक्रमही रोहितने आपल्या नावावर केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा खेळाडू कॉलिन मुर्नो आणि रोहित शर्मा यांच्या नावावर तीन शतके होती. ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये चार शतके लगावणारा रोहित हा एकमेव फलंदाज ठरला आहे.
ट्वेंटी-20 सामन्यांत भारताकडून सर्वाधिक धावांचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. कोहलीने 62 सामन्यांत 2102 धावा केल्या आहेत. या सामन्यापूर्वी रोहित कोहलीपेक्षा 11 धावांनी पिछाडीवर होता. पण या सामन्यात 10 धावांवर असताना रोहितने षटकार लगावला आणि भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.