कोलकाता, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्या भारताला विजय मिळवता आला होता. पण वेस्ट इंडिजच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताला सहज विजय मिळवता आला नव्हता. त्यामुळे आता जर भारताला दुसरा सामना जिंकायला असेल तर त्यांना काही गोष्टींवर मेहनत घेण्याची गरज असल्याचे म्हटले जात आहे.
पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी भेदक कामगिरी केली होती. त्यामुळे वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजी करताना 108 धावा करता आल्या होत्या. या आव्हानांचा पाठलाग भारतीय संघ सहज करेल, असे वाटले होते. पण भारताला या माफक आव्हानाचा पाठलाग करताना पाच फलंदाज गमवावे लागले होते.
वेस्ट इंडिजच्या 108 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भाराताची 4 बाद 45 अशी दयनीय अवस्था होती. पण त्यानंतर दिनेश कार्तिक आणि कृणाल पंड्या यांनी संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे भारताला जर दुसऱ्या सामन्यातही विजय मिळवायचा असेल तर त्यांनी फलंदाजीवर अधिक मेहनत घ्यायची गरज आहे. रोहित शर्मा, शिखर धवन, रिषभ पंत यांना दोन अंकी धावसंख्याही उभारता आली नव्हती. त्यामुळे भारताला जर दुसरा सामना जिंकायचा असेल तर त्यांना फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रीत करणं भाग असेल.