कोलकाता, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताचा कर्णधार रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात एका सामन्यात दोन विक्रम रचण्याचा पराक्रम केला आहे. भारताकडून सर्वाधिक धावांचा विक्रम रोहितने आपल्या नावावर केला आहे. त्याचबरोबर एक विश्वविक्रमही रोहितने आपल्या नावावर केला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा खेळाडू कॉलिन मुर्नो आणि रोहित शर्मा यांच्या नावावर तीन शतके होती. या सामन्यात रोहितने चौथे शतक लगावले. ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये चार शतके लगावणारा रोहित हा एकमेव फलंदाज ठरला आहे.
ट्वेंटी-20 सामन्यांत भारताकडून सर्वाधिक धावांचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. कोहलीने 62 सामन्यांत 2102 धावा केल्या आहेत. या सामन्यापूर्वी रोहित कोहलीपेक्षा 11 धावांनी पिछाडीवर होता. पण या सामन्यात 10 धावांवर असताना रोहितने षटकार लगावला आणि भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.