India vs West Indies 2nd T20I Time Change : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्याची वेळ रात्री ८ ऐवजी १० वाजता करण्यात आली होती. कारण, त्रिनबागो येथे सेंट किट्स येथे खेळाडूंचे सामानच पोहोचले नव्हते. पण, ९.३० वाजून गेल्यानंतर टॉस न झाल्याने चाहते अस्वस्थ झाले आणि समोर आली नवीन वेळ. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात ६८ धावांची विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज होणाऱ्या दुसऱ्या लढतीची सर्वांना उत्सुकता होती. सुरुवातीला हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजल्यापासून सुरू होणार होता.
विंडीज बोर्डाने ट्विट करून ही माहिती दिली आहे. खेळाडूंचे लगेज ( सामान) अद्याप त्रिनिदाद येथून सेंट किट्सला पोहोचलेले नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे. आता हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री १० वाजता सुरू होणार आहे. विंडीज क्रिकेट बोर्डाने याबद्दल चाहत्यांचे, प्रायोजकांचे, ब्रॉडकास्टर व इतरांची क्षमा मागितली आहे. पण, अपडेट माहितीनुसार हा सामना ११ वाजता सुरू होणार असल्याचे समोर आले आहे
रोहित शर्माला खुणावतोय विक्रमरोहितने आज ४४ धावा केल्या तर तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ हजार धावा पूर्ण करेल. रोहित शर्माने आतापर्यंत भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये ४०७ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४३.४७ च्या सरासरीने १५,९५६ धावा केल्या आहेत. भारतासाठी केवळ सहा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ हजार किंवा त्याहून अधिक धावा करू शकले आहेत. भारताकडून सर्वाधिक धावा करणारा सचिन तेंडुलकर आहे. सचिन तेंडुलकरने ६६४ सामन्यांमध्ये ४८.५२ च्या सरासरीने ३४ हजार ३५७ धावा केल्या. त्यात १०० शतकांचा समावेश आहे. रोहित शर्माने अर्धशतक ठोकून ५७ धावांचा आकडा गाठला, तर आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये तो ३ हजार ५०० धावांचा टप्पा ओलांडेल. आणि हा टप्पा पूर्ण करणारा रोहित जगातील पहिला फलंदाज ठरेल.