IND vs WI 2nd T20I : हार्दिक पांड्याने २ धावांत २ धक्के दिले, सूर्यकुमार यादवचा अफलातून झेल, पण... Video

India vs West Indies 2nd T20I Live Marathi : कर्णधार हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) पहिल्या षटकात वेस्ट इंडिजला दोन धक्के दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 10:38 PM2023-08-06T22:38:07+5:302023-08-06T22:38:22+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI 2nd T20I Live Marathi : Captain Hardik Pandya strikes twice in the first over, spectacular catch from Suryakumar yadav, Video | IND vs WI 2nd T20I : हार्दिक पांड्याने २ धावांत २ धक्के दिले, सूर्यकुमार यादवचा अफलातून झेल, पण... Video

IND vs WI 2nd T20I : हार्दिक पांड्याने २ धावांत २ धक्के दिले, सूर्यकुमार यादवचा अफलातून झेल, पण... Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies 2nd T20I Live Marathi : कर्णधार हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) पहिल्या षटकात वेस्ट इंडिजला दोन धक्के दिले. पहिल्या चेंडूवर ब्रेंडन किंगचा अफलातून झेल सूर्यकुमार यादवने टिपला अन् त्यानंतर जॉन्सन चार्सनेही सोपा झेल दिला. २ बाद २ धावा अशी दयनीय अवस्था असूनही वेस्ट इंडिजने निकोलस पूरनच्या फटकेबाजीच्या जोरावर चांगले पुनरागमन केले.  


शुबमन गिल ( ९), सूर्यकुमार यादव ( १) आणि संजू सॅमसन ( ७) यांनी आज पुन्हा अपयशाचा पाढा वाचला. इशान २३ चेंडूंत २ चौकार व २ षटकारासह २७ धावांवर बाद झाला. तिलकसह त्याने ४२ धावांची भागीदारी केली. तिलकने ३९ चेंडूंत पहिले अर्धशतक पूर्ण केले. तिलकला ५१ धावांवर ( ४१ चेंडू, ५ चौकार व १ षटकार) झेलबाद केले. हार्दिकसह त्याने २७ चेंडूंत ३८ धावा जोडल्या. हार्दिक ( २४ ) आणि अक्षर पटेल ( १४) यांनी धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. रवी बिश्नोई ( ८) व अर्शदीप सिंग ( ६) यांनी संघाला ७ बाद १५२ धावांपर्यंत पोहोचवले.  


तिलक वर्माने पहिल्या ट्वेंटी-२०त २२ चेंडूंत ३९ धावा केल्या होत्या आणि आज त्याने ४१ चेंडूंत ५१ धावांची खेळी केली.  भारतासाठी ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २०व्या वर्षी अर्धशतक झळकावणारा तो रोहितनंतर दुसरा फलंदाज ठरला. हार्दिक पांड्याने पहिल्याच षटकात विंडीजच्या दोन फलंदाजांना माघारी पाठवून २ बाद २ धावा अशी अवस्था केली आहे. सूर्यकुमार यादवने विंडीज सलामीवीर ब्रेंडन किंगचा अफलातून झेल घेतला, तर जॉन्सन चार्सने तिलकच्या हाती सोपा झेल दिला. कायले मायर्स व निकोलस पूरन यांनी चांगली फटकेबाजी केली. मायर्सने ७ चेंडूंत २ चौकार व १ षटकारांसह १५ धावा केल्या आणि अर्शदीप सिंगने त्याला LBW केले.



२ धावांत २ विकेट गमावूनही विंडीजच्या निकोलसची फटकेबाजी काही थांबता थांबत नव्हती. आज प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेल्या रवी बिश्नोईच्या पहिल्याच षटकात त्याने ४,६,०,४,४,० अशा १८ धावा कुटल्या. विंडीजने पॉवर प्लेमध्ये ३ बाद ६१ धावा केल्या. भारताविरुद्ध ट्वेंटी-२०त सर्वाधिक ५०२* धावांचा विक्रम निकोलसने नावावर करताना आरोन फिंचचा ( ५००) विक्रम मोडला.

Web Title: IND vs WI 2nd T20I Live Marathi : Captain Hardik Pandya strikes twice in the first over, spectacular catch from Suryakumar yadav, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.