Join us  

IND vs WI 2nd T20I : ५ चेंडूंत २ विकेट्स! शुबमन गिलची बॅट थंड राहिली, सूर्यकुमार यादवला घाई नडली, Video 

India vs West Indies 2nd T20I Live Marathi : दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात भारतीय संघाला अपेक्षित सुरुवात करता आली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2023 8:35 PM

Open in App

India vs West Indies 2nd T20I Live Marathi : दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात भारतीय संघाला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. फॉर्माशी संघर्ष करणाऱ्या शुबमन गिलने खणखणीत षटकार खेचला खरा, परंतु अल्झारी जोसेफने पुढच्याच चेंडूवर त्याला चालतं केलं. ५०वा ट्वेंटी-२० सामना खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवकडून आज अपेक्षा होती, परंतु त्याला १ धावेची घाई महागात पडली. कायले मायर्सने अप्रतिम थ्रो करून सूर्याला माघारी जाण्यास भाग पाडले. 

वेस्ट इंडिज संघाने पहिल्या ट्वेंटी-२०त ४ धावांनी विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.  हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कुलदीप यादवला दुखापतीमुळे आज संघाबाहेर बसावे लागले आणि त्याच्या जागी रवी बिश्नोईला संधी मिळाली आहे. नेट मध्ये फलंदाजीचा सराव करताना कुलदीपच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाल्याचे बीसीसीआयने सांगितले. 

इशान किशन व शुबमन गिल ही जोडी सलामीला आली आणि तिसऱ्याच षटकात अल्झारी जोसेफने धक्का दिला. शुबमन ७ धावांवर झेलबाद झाला. तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर शुबमनने खणखणीत षटकार खेचला. पण, त्यानंतर अल्झारीने चेंडू थोडा आखूड टाकला अन् शुबमनच्या बॅटची कड घेत तो डिपच्या दिशेने हवेत उडाला. शिमरोन हेटमायरने सहज झेल टिपला.  पुढच्याच षटकात आणखी एक मोठा धक्का बसला, सूर्यकुमार १ धाव करून रन आऊट झाला. इशानने एक धावसाठी कॉल दिला अन् सूर्याने क्रिज सोडली, परंतु तो स्ट्रायकर एंडपर्यंत पोहोचेपर्यंत मायर्सने वेगवान थ्रो करून दांडा उडवला. मायर्सने पहिल्या सामन्यात संजू सॅमसनला असेच रन आऊट केले होते.  

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजशुभमन गिलसूर्यकुमार अशोक यादव
Open in App