India vs West Indies 2nd T20I Live Marathi : संजू सॅमसनला आणखी किती संधी द्यायला हवी, हा प्रश्न आज त्याच्या बाद होण्याच्या स्टाईलवर सर्वांना पडला आहे. शुबमन गिल, सूर्यकुमार यादव झटपट माघारी परतल्यानंतर संजू सॅमसनला आज संधी होती, परंतु त्याने निराश केले. इशान किशन चांगला खेळ करत होता, परंतु तोही शुबमन सारखा षटकारानंतर पुढच्या चेंडूवर विकेट देऊन माघारी परतला.
५ चेंडूंत २ विकेट्स! शुबमन गिलची बॅट थंड राहिली, सूर्यकुमार यादवला घाई नडली, Video
हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात भारतीय संघाला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. फॉर्माशी संघर्ष करणाऱ्या शुबमन गिलने ( ९) खणखणीत षटकार खेचला खरा, परंतु अल्झारी जोसेफने पुढच्याच चेंडूवर त्याला चालतं केलं. ५०वा ट्वेंटी-२० सामना खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवकडून ( १) आज अपेक्षा होती, परंतु त्याला १ धावेची घाई महागात पडली. कायले मायर्सने अप्रतिम थ्रो करून सूर्याला माघारी जाण्यास भाग पाडले. कुलदीप यादवला दुखापतीमुळे आज संघाबाहेर बसावे लागले आणि त्याच्या जागी रवी बिश्नोईला संधी मिळाली आहे. मायर्सने पहिल्या सामन्यात संजू सॅमसनला असेच रन आऊट केले होते. ( सूर्याची विकेट पाहा)
इशान आणि तिलक वर्मा यांनी चांगली फटकेबाजी करताना भारताचा डाव रुळावर आणला. तिलकने मारलेला सुपला शॉट अप्रतिम होता. तरीही विंडीजच्या गोलंदाजांनी धावगती रोखून ठेवली होती. १०व्या षटकात इशानने षटकार खेचून धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. पण, पुढच्याच चेंडूवर रोमारिओ शेफर्डने भारतीय सलामीवीराचा दांडा उडवला. इशान २३ चेंडूंत २ चौकार व २ षटकारासह २७ धावांवर बाद झाला. तिलकसह त्याने ४२ धावांची भागीदारी केली. संजू सॅमसनने चौकाराने खाते उघडले, परंतु त्यानेही निराश केले. अकिल होसेनच्या चेंडूवर पुढे येऊन फटका मारण्याच्या प्रयत्नात तो ( ७) यष्टीचीत झाला. भारताला ११.२ षटकांत ७६ धावांवर चौथा धक्का बसला.
Web Title: IND vs WI 2nd T20I Live Marathi : Six and OUT! Ishan Kishan & Sanju Samson out; India is in trouble as they are 76/4, Watch wicket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.