India vs West Indies 2nd T20I Live Marathi : संघ व्यवस्थापनाचे प्रयोग भारतीय संघाच्या अंगलट येताना दिसत आहेत. प्रमुख खेळाडूंना सतत विश्रांती देऊन युवा खेळाडूंना खेळवण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असला तरी, तो महागात पडतोय. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला दुसऱ्या ट्वेंटी-२०तही वेस्ट इंडिजने बॅकफूटवर फेकले. तिलक वर्मा ( Tilak Varma) याच्या अर्धशतकाने भारताची लाज वाचवली खरी, परंतु वेस्ट इंडिजला रोखण्यासाठी संघाला पुरेशी धावसंख्या नाही उभारता आली.
Six and OUT! भारतीय फलंदाजांची परंपरा, इशान किशनचा उडाला दांडा; संजू सॅमसन अपयशी, Video
शुबमन गिलने ( ९) खणखणीत षटकार खेचला खरा, परंतु अल्झारी जोसेफने पुढच्याच चेंडूवर त्याला चालतं केलं. ५०वा ट्वेंटी-२० सामना खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवकडून ( १) आज अपेक्षा होती, परंतु त्याला १ धावेची घाई महागात पडली. कायले मायर्सने अप्रतिम थ्रो करून सूर्याला माघारी जाण्यास भाग पाडले. इशान आणि तिलक वर्मा यांनी चांगली फटकेबाजी करताना भारताचा डाव रुळावर आणला. तिलकने मारलेला सुपला शॉट अप्रतिम होता. तरीही विंडीजच्या गोलंदाजांनी धावगती रोखून ठेवली होती.
१०व्या षटकात इशानने षटकार खेचून धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. पण, पुढच्याच चेंडूवर रोमारिओ शेफर्डने भारतीय सलामीवीराचा दांडा उडवला. इशान २३ चेंडूंत २ चौकार व २ षटकारासह २७ धावांवर बाद झाला. तिलकसह त्याने ४२ धावांची भागीदारी केली. संजू सॅमसन ( ७) अकिल होसेनच्या चेंडूवर पुढे येऊन फटका मारण्याच्या प्रयत्नात यष्टीचीत झाला. तिलकने एकबाजू धरून ठेवली होती आणि ३९ चेंडूंत पहिले अर्धशतक पूर्ण केले. शेवटच्या ५ षटकांत भारताने धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न केला. अकिलने चतुराईने चेंडू टाकून तिलकला ५१ धावांवर ( ४१ चेंडू, ५ चौकार व १ षटकार) झेलबाद केले. हार्दिकसह त्याने २७ चेंडूंत ३८ धावा जोडल्या.