IND vs WI 2nd T20I : निकोलस पूरनने दिले पराभवाचे 'चुरण'! वेस्ट इंडिजचा थरारक विजय, १२ वर्षानंतर केला पराक्रम

India vs West Indies 2nd T20I Live Marathi : भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात जबरदस्त पुनरागमन केले होते, परंतु त्यांना पराभव टाळता आला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 11:41 PM2023-08-06T23:41:40+5:302023-08-06T23:42:27+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI 2nd T20I Live Marathi : West Indies have defeated India to take 2-0 lead in this T20i series.  | IND vs WI 2nd T20I : निकोलस पूरनने दिले पराभवाचे 'चुरण'! वेस्ट इंडिजचा थरारक विजय, १२ वर्षानंतर केला पराक्रम

IND vs WI 2nd T20I : निकोलस पूरनने दिले पराभवाचे 'चुरण'! वेस्ट इंडिजचा थरारक विजय, १२ वर्षानंतर केला पराक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies 2nd T20I Live Marathi : भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात जबरदस्त पुनरागमन केले होते, परंतु त्यांना पराभव टाळता आला नाही. २ धावा २ विकेटनंतर वेस्ट इंडिजने निकोलस पूरन व रोव्हमन पॉवेल यांच्या फटकेबाजीच्या जोरावर दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात चांगले कमबॅक केले होते. भारतीय गोलंदाज हतबल झालेले पाहायला मिळाले, परंतु नशिबाचे चक्र फिरले. पूरनची विकेट पडली अन् भारतीय गोलंदाजाने पुढील ३ धावांत ४ विकेट्स घेत वेस्ट इंडिजला बॅकफूटवर फेकले आणि हातातून निसटलेला सामना खेचून आणला होता. मात्र, १९व्या षटकात सामना फिरला अन् विंडीजने २-० अशी आघाडी घेतली. 12 वर्षानंतर भारतीय संघ द्विदेशीय मालिकेत विंडीजकडून सलग दोन सामन्यांत हरला. 

विकेट मिळवण्यासाठी इशान किशन जास्तच 'स्मार्ट' बनायला गेला अन्... Video


हार्दिक पांड्याने पहिल्याच षटकात ब्रेंडन किंग व जॉन्सन चार्ल्स या दोन फलंदाजांना माघारी पाठवले. कायले मायर्स ( १५) व निकोलस पूरन यांनी चांगली फटकेबाजी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु अर्शदीप सिंगने ही जोडी तोडली.  रवी बिश्नोईच्या पहिल्याच षटकात निकोलसने ४,६,०,४,४,० अशी फटकेबाजी केली. निकोलस व कर्णधार रोव्हमन पॉवेल ( २१) यांनी ३७ चेंडूंत ५७ धावांची भागीदारी केली. पूरनने भारताची डोकेदुखी वाढवली होती आणि त्यात शिमरोन हेटमायरची भर पडली. मुकेश कुमारने भारताला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. पूरन ४० चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ६७ धावांवर झेलबाद झाला.

 


पुढच्या षटकात बिश्नोईने १ धाव देत विंडीजवर दडपण वाढवले अन् त्याच्या पुढील षटकात रोमारिओ शेफर्ट (०) रन आऊट झाला. त्यानंतर युझवेंद्र चहलने विंडीजला मोठा धक्का दिला. जेसन होल्डरला ( ०) त्याने यष्टिचीत केले आणि भारताला सामन्यात डोकं वर काढून दिले. त्याच षटकात चहलने मोठी विकेट मिळवताना हेटमायरला ( २२) LBW केले.  आता २४ चेंडू २४ धावा विंडीजला हव्या होत्या अन् भारताला २ विकेट्स घ्यायच्या होत्या. हार्दिकने ३५ धावांत ३ विकेट्स घेतल्या. १२ चेंडूंत १२ धावांची गरज असताना हार्दिकने चेंडू मुकेश कुमारकडे दिला. हे षटक चहलला द्यायला हवे होते असे अनेकांनी मत व्यक्त केले.

अल्झारी जोसेफने दुसराच चेंडू षटकार खेचून सामना ९ चेंडूंत ४ धावा असा आणला. जोसेफने १ धाव घेत अकिल होसेनला स्ट्राईक दिली अन् त्याने २ धावा घेतल्या. होसेनने चौकार खेचून १८.५ षटकांत ८ बाद १५५ धावा करून विंडीजचा विजय निश्चित केला. 

Image

तत्पूर्वी, शुबमन गिल ( ९), सूर्यकुमार यादव ( १) आणि संजू सॅमसन ( ७) यांनी आज पुन्हा अपयशाचा पाढा वाचला. इशान २३ चेंडूंत २ चौकार व २ षटकारासह २७ धावांवर बाद झाला. तिलकसह त्याने ४२ धावांची भागीदारी केली. तिलकने ३९ चेंडूंत पहिले अर्धशतक पूर्ण केले. तिलकला ५१ धावांवर ( ४१ चेंडू, ५ चौकार व १ षटकार) झेलबाद केले. हार्दिकसह त्याने २७ चेंडूंत ३८ धावा जोडल्या. हार्दिक ( २४ ) आणि अक्षर पटेल ( १४) यांनी धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. रवी बिश्नोई ( ८) व अर्शदीप सिंग ( ६) यांनी संघाला ७ बाद १५२ धावांपर्यंत पोहोचवले.   
 

Web Title: IND vs WI 2nd T20I Live Marathi : West Indies have defeated India to take 2-0 lead in this T20i series. 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.