Join us  

IND vs WI, 2nd T20I Live Update : विराट कोहलीने वातावरण निर्माण केले अन् रिषभ पंत, वेंकटेश अय्यरने हात धुवून घेतले; विंडीजला तुफान कुटले

India vs West Indies 2nd T20I Live Update : इशान किशन, रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांना आज मोठी खेळी करण्यात अपयश आले असले तरी विराट कोहली व रिषभ पंत यांनी टीम इंडियाचा डाव सावरला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 8:44 PM

Open in App

India vs West Indies 2nd T20I Live Update : इशान किशन, रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांना आज मोठी खेळी करण्यात अपयश आले असले तरी विराट कोहलीरिषभ पंत यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. वेस्ट इंडिजच्या रोस्टन चेसने भारताला तीन मोठे धक्के देऊन बॅकफूटवर फेकले. मात्र, विराटच्या अर्धशतकाने सामन्यातील आव्हान कायम राखले. रिषभ पंतवेंकटेश अय्यर यांनी अखेरच्या षटकांत आतषबाजी केली आणि विंडीजसमोर तगडे आव्हान उभे केले.  

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आणि दुसऱ्याच षटकात विकेट घेत विंडीजने मोठा धक्का दिला. इशान किशन दुसऱ्याच षटकात माघारी परतला. शेल्डन कोट्रेलच्या चेंडूचा अंदाज घेण्यात तो चूकला अन् कायल मेयर्सने ( २) त्याचा सोपा झेल घेतला. विराट व रोहित ही जोडी आज  कमाल करणार असे वाटत असताना पोलार्डने ७व्या षटकात रोस्टन चेसला गोलंदाजीला आणले आणि त्याने पहिल्याच षटकात रोहितला धक्का दिला.. रोहित १८ चेंडूंत २ चौकार व १ षटकारासह १९ धावांवर झेलबाद झाला आणि विराटसह त्याची ४९ धावांची भागीदारीही संपुष्टात आली. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादव ( ८) बाद झाला. 

विराट आज भलत्याच फॉर्मात दिसला. स्ट्रेट ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, पुल, लेट कट, रिव्हर्स स्विप असे भात्यातील  सर्व फटके त्याने आज आजमावले.  विराटने खणखणीत षटकार मारून ट्वेंटी-२०तील ३० वे अर्धशतक पूर्ण केले. रोहितच्या नेतृत्वाखाली हे त्याचे पहिलेच , तर वेस्ट इंडिजविरुद्धचे सहावे अर्धशतक ठरले. तो ४१ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ५२ धावावंर त्रिफळाचीत झाला. रोस्टनने त्याच्या चार षटकांत रोहित, सूर्यकुमार व विराट अशा तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. वेंकटेश अय्यर व रिषभ पंत यांनी २३ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. या दोघांच्या फटकेबाजीने विंडीज गोलंदाजांची लय बिघडवली आणि भारताला अतिरिक्त धावाही मिळाल्या.

रिषभ व वेंकटेश यांनी सहाव्या पाचव्याविकेटसाठी ३५ चेंडूंत ७६ धावांची भागीदारी केली. वेंकटेश १८ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३३ धावांवर माघारी परतला. रिषभने २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. तो २८ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ५८ धावांवर नाबाद राहिला. भारताने ५ बाद १८६ धावांचा डोंगर उभा केला. 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरिषभ पंतविराट कोहलीवेंकटेश अय्यर
Open in App