IND vs WI, 2nd T20I Live Update : रिषभ पंतचा वन हँड सिक्स पाहून रोहित शर्मा इम्प्रेस झाला, डगआऊटमध्ये बसून चेंडूकडे पाहतच राहिला, Video

India vs West Indies 2nd T20I Live Update : रिषभ पंतने आज भारी खेळ केला. विराट कोहलीच्या अर्धशतकाने टीम इंडियाला भक्कम स्थिरता मिळवून दिली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 09:16 PM2022-02-18T21:16:00+5:302022-02-18T21:24:03+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI, 2nd T20I Live Update : One handed six from Rishabh Pant, Rohit Sharma's reaction after seeing Rishabh Pant's six, Video  | IND vs WI, 2nd T20I Live Update : रिषभ पंतचा वन हँड सिक्स पाहून रोहित शर्मा इम्प्रेस झाला, डगआऊटमध्ये बसून चेंडूकडे पाहतच राहिला, Video

IND vs WI, 2nd T20I Live Update : रिषभ पंतचा वन हँड सिक्स पाहून रोहित शर्मा इम्प्रेस झाला, डगआऊटमध्ये बसून चेंडूकडे पाहतच राहिला, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies 2nd T20I Live Update : रिषभ पंतने आज भारी खेळ केला. विराट कोहलीच्या अर्धशतकाने टीम इंडियाला भक्कम स्थिरता मिळवून दिली होती. त्यानंतर रिषभने वेंकटेश अय्यरला सोबत घेऊन वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनी ३५ चेंडूंत ७६ धावांची भागीदारी करून टीम इंडियाला ५ बाद १८६ धावांपर्यंत मजल मारून दिली. विराटने ४१ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ५२ धावा केल्या. रिषभ २८ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ५८ धावांवर नाबाद राहिला, तर वेंकटेश १८ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३३ धावांवर माघारी परतला.

इशान किशन, रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांना आज मोठी खेळी करण्यात अपयश आले असले तरी विराट कोहली व रिषभ पंत यांनी टीम इंडियाचा डाव सावरला.  रोहित १८ चेंडूंत २ चौकार व १ षटकारासह १९ धावांवर झेलबाद झाला आणि विराटसह त्याची ४९ धावांची भागीदारीही संपुष्टात आली. वेंकटेश अय्यर व रिषभ पंत यांनी २३ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. या दोघांच्या फटकेबाजीने विंडीज गोलंदाजांची लय बिघडवली आणि भारताला अतिरिक्त धावाही मिळाल्या. रिषभ व वेंकटेश यांनी सहाव्या पाचव्याविकेटसाठी ३५ चेंडूंत ७६ धावांची भागीदारी केली. भारताने ५ बाद १८६ धावांचा डोंगर उभा केला. 

रिषभ पंतच्या वन हँड सिक्सने रोहितला इम्प्रेस केले, पाहा व्हिडीओ..

Web Title: IND vs WI, 2nd T20I Live Update : One handed six from Rishabh Pant, Rohit Sharma's reaction after seeing Rishabh Pant's six, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.