India vs West Indies 2nd T20I Live Update : India Playing XI: वन डे मालिका गाजवल्यानंतर भारतीय संघानं ट्वेंटी-२० मालिकेत दणक्यात सुरुवात केली. भारताने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यांत ६ विकेट्स राखून विजय मिळवला. रवी बिश्नोई, रोहित शर्मा, हर्षल पटेल, सूर्यकुमार यादव आणि वेंकटेश अय्यर यांनी चांगली कामगिरी केली. इशान किशन यानेही पहिल्या सामन्यात ४२ चेंडूंत ३५ धावा केल्या, परंतु सामन्यानतंर कर्णधार रोहितने त्याची शाळा घेतली. त्यामुळे आजच्या सामन्यात तरी ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) याला संधी मिळते का याची उत्सुकता आहे.
न्यूझीलंडविरुद्धची मालिकेनंतर आता विंडीजविरुद्धच्या मालिकेतही बाकावर बसलेल्या ऋतुराजने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करून दाखवली आहे. त्याशिवाय त्याने स्थानिक क्रिकेट स्पर्धेतही उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली आहे. तरीही त्याला संधी मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत इशान किशनला सलामीला खेळण्याची संधी मिळाली, परंतु त्याच्या कामगिरीवर माजी कसोटीपटू सुनील गावस्कर व समालोचक हर्षा भोगले यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
रोहित हा नेहमीच युवा खेळाडूंना संधी देत आला आहे. पण, संघात निवड झाल्यापासून ऋतुराज बाकावरच बसून आहे आणि आजच्या सामन्यातही त्याला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.
भारताचा संभाव्य संघ - इशान किशन/ऋतुराज गायकवाड, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, वेंकटेश अय्यर, दीपक चहर/शार्दूल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल.
सामना किती वाजता सुरू होणार - टॉस ६.३० वाजता, तर सामना ७ वाजता सुरू होईल
थेट प्रक्षेपण- स्टार स्पोर्ट्स व हॉटस्टार
Web Title: IND vs WI, 2nd T20I Live Update : Rohit Sharma eyes series win, will Ruturaj replace Kishan?, probable playing XI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.