IND vs WI, 2nd T20I Live Update : वेंकटेश अय्यरचा 'डबल बॅट' चौकार अन् टीम इंडियाच्या डग आऊटमध्ये झालेली पळापळ पाहिलीत का?, Video 

India vs West Indies 2nd T20I Live Update : रिषभ पंत आणि वेंकटेश अय्यर यांनी अखेरच्या षटकातं तुफान फटकेबाजी करून मस्त माहोल बनवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 09:53 PM2022-02-18T21:53:52+5:302022-02-18T21:54:22+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI, 2nd T20I Live Update : Venkatesh Iyer hits a 'double bat' boundary en route to 18-ball 33 runs, Indian dugout rushing for cover, Video  | IND vs WI, 2nd T20I Live Update : वेंकटेश अय्यरचा 'डबल बॅट' चौकार अन् टीम इंडियाच्या डग आऊटमध्ये झालेली पळापळ पाहिलीत का?, Video 

IND vs WI, 2nd T20I Live Update : वेंकटेश अय्यरचा 'डबल बॅट' चौकार अन् टीम इंडियाच्या डग आऊटमध्ये झालेली पळापळ पाहिलीत का?, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies 2nd T20I Live Update : रिषभ पंत आणि वेंकटेश अय्यर यांनी अखेरच्या षटकातं तुफान फटकेबाजी करून मस्त माहोल बनवला. विराट कोहलीच्या अर्धशतकाने टीम इंडियाला भक्कम स्थिरता मिळवून दिली होती. त्यानंतर रिषभने वेंकटेश अय्यरला सोबत घेऊन वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनी ३५ चेंडूंत ७६ धावांची भागीदारी करून टीम इंडियाला ५ बाद १८६ धावांपर्यंत मजल मारून दिली. विराटने ४१ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ५२ धावा केल्या. रिषभ २८ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ५८ धावांवर नाबाद राहिला, तर वेंकटेश १८ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३३ धावांवर माघारी परतला. वेंकटेशचा 'डबल बॅट' चौकार या सामन्यात चर्चेत राहिला अन् त्याच्या एका फटक्यामुळे टीम इंडियाच्या डग आऊटमध्ये एकच गोंधळ उडाला. 

इशान किशन, रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांना आज मोठी खेळी करण्यात अपयश आले असले तरी विराट कोहली व रिषभ पंत यांनी टीम इंडियाचा डाव सावरला.  रोहित १८ चेंडूंत २ चौकार व १ षटकारासह १९ धावांवर झेलबाद झाला आणि विराटसह त्याची ४९ धावांची भागीदारीही संपुष्टात आली. वेंकटेश अय्यर व रिषभ पंत यांनी २३ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. या दोघांच्या फटकेबाजीने विंडीज गोलंदाजांची लय बिघडवली आणि भारताला अतिरिक्त धावाही मिळाल्या. रिषभ व वेंकटेश यांनी सहाव्या पाचव्याविकेटसाठी ३५ चेंडूंत ७६ धावांची भागीदारी केली. भारताने ५ बाद १८६ धावांचा डोंगर उभा केला.  

वेंकटेशने 183.33 च्या स्ट्राईक रेटने आज फटकेबाजी केली. शेल्डन कोट्रेलने टाकलेल्या १६व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर वेंकटेशकडून डबल बॅट चौकार गेला.  

पाहा व्हिडीओ... 


 

Web Title: IND vs WI, 2nd T20I Live Update : Venkatesh Iyer hits a 'double bat' boundary en route to 18-ball 33 runs, Indian dugout rushing for cover, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.