IND vs WI, 2nd T20I Live Update : नाणेफेकीचा कौल विंडीजच्या बाजूने लागला; पाहा टीम इंडियाने प्लेईंग इलेव्हनमध्ये काय बदल केला....

वन डे मालिका गाजवल्यानंतर भारतीय संघानं ट्वेंटी-२० मालिकेत दणक्यात सुरुवात केली. भारताने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यांत ६ विकेट्स राखून विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 06:36 PM2022-02-18T18:36:38+5:302022-02-18T18:37:11+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI, 2nd T20I Live Update : West Indies won the toss and decided to bowl first, India are going in with an unchanged playing XI. | IND vs WI, 2nd T20I Live Update : नाणेफेकीचा कौल विंडीजच्या बाजूने लागला; पाहा टीम इंडियाने प्लेईंग इलेव्हनमध्ये काय बदल केला....

IND vs WI, 2nd T20I Live Update : नाणेफेकीचा कौल विंडीजच्या बाजूने लागला; पाहा टीम इंडियाने प्लेईंग इलेव्हनमध्ये काय बदल केला....

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies 2nd T20I Live Update : वेस्ट इंडिजचा कर्णधार किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) आज १०० वा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे आणि विंडीज संघाने सामन्याआधी त्याचा सत्कार सोहळा पार पाडला. वेस्ट इंडिजने दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.  


वन डे मालिका गाजवल्यानंतर भारतीय संघानं ट्वेंटी-२० मालिकेत दणक्यात सुरुवात केली. भारताने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यांत ६ विकेट्स राखून विजय मिळवला. रवी बिश्नोई, रोहित शर्मा, हर्षल पटेल, सूर्यकुमार यादव आणि वेंकटेश अय्यर यांनी चांगली कामगिरी केली. इशान किशन यानेही पहिल्या सामन्यात  ४२ चेंडूंत ३५ धावा केल्या, परंतु सामन्यानतंर कर्णधार रोहितने त्याची शाळा घेतली. त्यामुळे आजच्या सामन्यात तरी ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) याला संधी मिळते का याची उत्सुकता होती. पण, रोहितने तोच संघ कायम राखला आहे. विंडीजच्या संघात जेसन होल्डरचे पुनरागमन झाले आहे आणि फॅबियन एलनला बाकावर बसावे लागणार आहे. दुखापतीमुळे जेसन पहिल्या ट्वेंटी-२०त खेळला नव्हता. भारतीय संघात कोणताच बदल करण्यात आलेला नाही.

भारतीय संघ - रोहित शर्मा, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, वेंकटेश अय्यर, दीपक चहर, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल ( Rohit Sharma (c), Ishan Kishan, Virat Kohli, Rishabh Pant (w), Suryakumar Yadav, Venkatesh Iyer, Deepak Chahar, Bhuvneshwar Kumar, Harshal Patel, Ravi Bishnoi, Yuzvendra Chahal)  

 

Web Title: IND vs WI, 2nd T20I Live Update : West Indies won the toss and decided to bowl first, India are going in with an unchanged playing XI.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.