India vs West Indies 2nd T20I Live Update : वेस्ट इंडिजचा कर्णधार किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) आज १०० वा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे आणि विंडीज संघाने सामन्याआधी त्याचा सत्कार सोहळा पार पाडला. वेस्ट इंडिजने दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वन डे मालिका गाजवल्यानंतर भारतीय संघानं ट्वेंटी-२० मालिकेत दणक्यात सुरुवात केली. भारताने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यांत ६ विकेट्स राखून विजय मिळवला. रवी बिश्नोई, रोहित शर्मा, हर्षल पटेल, सूर्यकुमार यादव आणि वेंकटेश अय्यर यांनी चांगली कामगिरी केली. इशान किशन यानेही पहिल्या सामन्यात ४२ चेंडूंत ३५ धावा केल्या, परंतु सामन्यानतंर कर्णधार रोहितने त्याची शाळा घेतली. त्यामुळे आजच्या सामन्यात तरी ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) याला संधी मिळते का याची उत्सुकता होती. पण, रोहितने तोच संघ कायम राखला आहे. विंडीजच्या संघात जेसन होल्डरचे पुनरागमन झाले आहे आणि फॅबियन एलनला बाकावर बसावे लागणार आहे. दुखापतीमुळे जेसन पहिल्या ट्वेंटी-२०त खेळला नव्हता. भारतीय संघात कोणताच बदल करण्यात आलेला नाही.
भारतीय संघ - रोहित शर्मा, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, वेंकटेश अय्यर, दीपक चहर, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल ( Rohit Sharma (c), Ishan Kishan, Virat Kohli, Rishabh Pant (w), Suryakumar Yadav, Venkatesh Iyer, Deepak Chahar, Bhuvneshwar Kumar, Harshal Patel, Ravi Bishnoi, Yuzvendra Chahal)