IND vs WI 2nd T20I Live Updates : ओबेड मॅकॉयने कशी वाट लावली, ६ विकेट्सच्या विक्रमी कामगिरीचा १.३० मिनिटांचा Video पाहा 

India vs West Indies 2nd T20I Live Updates : मॅकॉयने ४-१-१७-६ अशी अप्रतिम गोलंदाजी केली. त्यानंतर वेस्ट इंडिजने १९.२ षटकांत ५ बाद १४१ धावा करून विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 07:44 AM2022-08-02T07:44:14+5:302022-08-02T07:45:02+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI 2nd T20I Live Updates : Watch all the 6-wicket haul by Obed McCoy in 1.30 min Video, West Indies beat India by 5 wickets level the series 1-1 | IND vs WI 2nd T20I Live Updates : ओबेड मॅकॉयने कशी वाट लावली, ६ विकेट्सच्या विक्रमी कामगिरीचा १.३० मिनिटांचा Video पाहा 

IND vs WI 2nd T20I Live Updates : ओबेड मॅकॉयने कशी वाट लावली, ६ विकेट्सच्या विक्रमी कामगिरीचा १.३० मिनिटांचा Video पाहा 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies 2nd T20I Live Updates : भारतीय फलंदाजांनी आज निराश केले, ओबेड मॅकॉयच्या भेदर माऱ्यापुढे त्यांनी शरणागती पत्करली. मॅकॉयने ४-१-१७-६ अशी अप्रतिम गोलंदाजी केली. त्यानंतर वेस्ट इंडिजने १९.२ षटकांत ५ बाद १४१ धावा करून विजय मिळवला. ब्रेंड किंगने ५२ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ६८ धावा केल्या, तर डेव्हॉन थॉमसने १९ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह नाबाद ३१ धावा करून विजयी चौकार खेचला. वेस्ट इंडिजने मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. ६  विकेट्स घेणाऱ्या मॅकॉयला मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार दिला. 

मॅकॉयने ६वी विकेट घेत इतिहास घडवताना ट्वेंटी-२०त वेस्ट इंडिजकडून सर्वोत्तम गोलंदाजीची नोंद केली.  आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधील ही चौथी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. या लिस्टमध्ये भारताचा दीपक चहर ( ६-७ वि. बांगलादेश, २०१९), श्रीलंकेचा अजंथा मेंडिस ( ६-८ वि. झिम्बाब्वे, २०१२ व ६-१६ वि. ऑस्ट्रेलिया, २०११), ओबेड मॅकॉय ( ६-१७ वि. भारत, २०२२) आणि युजवेंद्र चहल ( ६-२५ वि. इंग्लंड, २०१७)  अशी क्रमवारी आहे. वेस्ट इंडिजकडून ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात सहा विकेट्स घेणारा मॅकॉय पहिलाच गोलंदाज ठरला. किमो पॉल याने बांगलादेशविरुद्ध २०१८मध्ये १५ धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या. मॅकॉयने आज सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम केला. डॅरेन सॅम ( ५-२६ वि. झिम्बाब्वे, २०१०) व जेसन होल्डर ( ५-२७ वि इंग्लंड २०२२) यांनी पाच विकेट्स घेतल्या आहेत.   


विंडीजला १२ चेंडूंत १६ धावा करायच्या होत्या. अर्शदीप सिंगने १९व्या षटकात रोवमन पॉवेलचा ( ५) यॉर्करवर त्रिफळा उडवून विंडीजला पाचवा धक्का दिला. अर्शदीपने त्या षटकात ६ धावा देताना १ विकेट घेतली. विंडीजला ६ धावांत १० धावांची गरज होती. २०व्या षटकात आवेश खानचा पहिलाच चेंडू नो बॉल पडला अन् फ्री हिटवर डेव्हॉन थॉमसने षटकार खेचला. ५ चेंडू २ धावा असा सामना विंडीजच्या बाजूने झुकला. थॉमसने चौकार खेचून विंडीजला विजय मिळवून दिला. विंडीजने ५ विकेट्स व ४ चेंडू राखून विजय मिळवताना मालिका १-१ अशी बरोबरीत आणली.  
 

Web Title: IND vs WI 2nd T20I Live Updates : Watch all the 6-wicket haul by Obed McCoy in 1.30 min Video, West Indies beat India by 5 wickets level the series 1-1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.