India vs West Indies 2nd T20I Live Updates : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा ट्वेंटी-२० सामना तीन तास विलंबाने सुरू झाला. त्रिनबागो येथे सेंट किट्स येथे खेळाडूंचे सामानच पोहोचले नसल्याने सुरुवातीला हा सामना १० वाजता सुरू होईल असे सांगितले गेले. पण, तरीही विलंब झालाच आणि अखेर १०.३०वाजता नाणेफेक झाली. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात एक बदल पाहायला मिळाला.
रोहित शर्माने आज ४४ धावा केल्या तर तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ हजार धावा पूर्ण करेल.
रोहित शर्माने आतापर्यंत भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये ४०७ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४३.४७ च्या सरासरीने १५,९५६ धावा केल्या आहेत. भारतासाठी केवळ सहा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ हजार किंवा त्याहून अधिक धावा करू शकले आहेत. भारताकडून सर्वाधिक धावा करणारा सचिन तेंडुलकर आहे. सचिन तेंडुलकरने ६६४ सामन्यांमध्ये ४८.५२ च्या सरासरीने ३४ हजार ३५७ धावा केल्या. त्यात १०० शतकांचा समावेश आहे. रोहित शर्माने अर्धशतक ठोकून ५७ धावांचा आकडा गाठला, तर आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये तो ३ हजार ५०० धावांचा टप्पा ओलांडेल. आणि हा टप्पा पूर्ण करणारा रोहित जगातील पहिला फलंदाज ठरेल.
भारतीय संघात फिरकीपटू रवी बिश्नोईच्या जागी आवेश खानला आज खेळवण्यात आले आहे. रोहित शर्मा व रिषभ पंत सलामीला येणार असून श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा अशी बॅटींग लाईनअप आहे. भुवनेश्वर कुमार, आर अश्विन, आवेश खान व अर्षदीप सिंग असा उर्वरित संघ आहे. हर्षल पटेलला दुखापत झाल्याने तो दुसऱ्या व तिसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध नसणार असल्याचे BCCI ने सांगितले
Web Title: IND vs WI 2nd T20I Live Updates : West Indies win the toss and will bowl first, Avesh Khan replaces Ravi Bishnoi, know playing XI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.