IND vs WI 2nd Test : विराट कोहलीचे ७६ वे आंतरराष्ट्रीय शतक; ५००व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात नोंदवला भीमपराक्रम

India Vs West Indies 2nd Test Live : विराट कोहलीने ५००वा आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावून इतिहास घडविला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 08:08 PM2023-07-21T20:08:22+5:302023-07-21T20:08:39+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI 2nd Test Live Marathi : 76TH INTERNATIONAL CENTURY BY Virat Kohli, BECOMES THE FIRST PLAYER TO SCORE HUNDRED ON 500th MATCH. | IND vs WI 2nd Test : विराट कोहलीचे ७६ वे आंतरराष्ट्रीय शतक; ५००व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात नोंदवला भीमपराक्रम

IND vs WI 2nd Test : विराट कोहलीचे ७६ वे आंतरराष्ट्रीय शतक; ५००व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात नोंदवला भीमपराक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Vs West Indies 2nd Test Live : विराट कोहलीने ५००वा आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावून इतिहास घडविला. ५०० आंतरराष्ट्रीय सामन्यांत सर्वाधिक ७६ शतकांचा विक्रम त्याने नावावर करताना सचिन तेंडुलकरला ( ७५) मागे टाकले. ५००व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला. कसोटी क्रिकेटमधील हे त्याचे २९वे शतक ठरले अन् भारताच्या ४ बाद ३१७ धावा झाल्या आहेत. 


यशस्वी जैस्वाल ( ५७) आणि रोहित शर्मा ( ८०) यांच्या १३९ धावांच्या भागीदारीनंतर विराट कोहलीने भारताचा डाव सावरला. दुसऱ्या सत्रात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी ६१ धावांत ४ विकेट घेत पुनरागमन केले होते. पण, विराट आणि रवींद्र जडेजा या जोडीने पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून भारताला पुन्हा फ्रंटसीटवर आणले. विराटने परदेशात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करण्याच्या विक्रमात रिकी पाँटिंगला मागे टाकले. सचिनने घराबाहेर सर्वाधिक २०१६५ धावा केल्या आहेत, त्यापाठोपाठ कुमार संगकारा ( १५९७३), राहुल द्रविड ( १५२०४), विराट ( १४३७६*) आणि पाँटिंग ( १४३६६) असा क्रम येतो. 


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराटने पाचवे स्थान पटकावले. सचिन तेंडुलकर ( ३४३५७), कुमार संगकारा ( २८०१६), रिकी पाँटिंग ( २७४८३), माहेला जयवर्धने ( २५९५७) आणि विराट ( २५५३६*) असे टॉप पाच फलंदाज आहेत. पहिल्या दिवसअखेर भारताने  ८४ षटकांत ४ बाद २८८ धावा केल्या. विराट १६१ चेंडूंत ८ चौकारांसह ८७ धावांवर, तर जडेजा ३६ धावांवर नाबाद होता. या दोघांनी दुसऱ्या दिवसाची सावध सुरूवात केली. 

Image

Web Title: IND vs WI 2nd Test Live Marathi : 76TH INTERNATIONAL CENTURY BY Virat Kohli, BECOMES THE FIRST PLAYER TO SCORE HUNDRED ON 500th MATCH.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.