मोहम्मद सिराजची कपिल देव यांच्या ३४ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी; कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी

India vs West Indies 2nd Test Live Marathi : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या पहिल्या ५ षटकांत वेस्ट इंडिजचा निम्मा संघ तंबूत पाठवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 08:25 PM2023-07-23T20:25:28+5:302023-07-23T20:27:19+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI 2nd Test Live Marathi : After Kapil Dev ( 1989) Mohammed Siraj became a 2nd Indian Pacers to Pick 5fer at Port of Spain, India 41/0 | मोहम्मद सिराजची कपिल देव यांच्या ३४ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी; कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी

मोहम्मद सिराजची कपिल देव यांच्या ३४ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी; कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies 2nd Test Live Marathi : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या पहिल्या ५ षटकांत वेस्ट इंडिजचा निम्मा संघ तंबूत पाठवला. भारताच्या ४३८ धावांच्या प्रत्युत्तरात विंडीजचा संपूर्ण संघ २५५ धावांत माघारी परतला अन् भारताने पहिल्या डावात १८३ धावांची आघाडी घेतली. मुकेश कुमारने दिवसाची पहिली विकेट घेतली अन् त्यानंतर मोहम्मद सिराजने ( Mohammed Siraj) धडाधड ४ विकेट्स घेतल्या. त्याने २३.४-६-६०-५ अशी अप्रतिम स्पेल टाकली आणि ही त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. सिराजने आजच्या पाच विकेट्सनंतर कपिल देव यांच्याशी बरोबरी केली. 


भारताच्या पहिल्या डावातील ४३८ धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने चांगली सुरुवात केली. कर्णधार क्रेग ब्रेथवेट ( ७५),  तेजनारायण चंद्रपॉल ( ३३), किर्म मॅकेंझी ( ३२), जेर्मेन ब्लॅकवूड ( २०) आणि जोशुआ डा सिल्व्हा ( १०) बाद झाल्याने तिसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडिजच्या ५ बाद २२९ धावा झाल्या होत्या. चौथ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात मुकेश कुमारने भारताला यश मिळवून दिले. एलिक अथानाझे ( ३७) पायचीत झाला. त्यानंतर मोहम्मद सिराजने जेसन होल्डर( १५), अल्झारी जोसेफ ( ४), केमार रोच ( ४) व शेनॉन गॅब्रिएल ( ०) यांना बाद केले. तिसऱ्या दिवसाच्या अखेरच्या चेंडूवर सिराजने जोशुआचा त्रिफळा उडवला होता. कालच्या ५ बाद २२९ धावांवरून आज सुरूवात करणाऱ्या विंडीजने २६ धावांत ५ विकेट्स गमावल्या.  

Image
पोर्ट ऑफ स्पेनमध्ये कसोटीत पाच विकेट्स घेणारा सिराज हा दुसरा भारतीय जलजगती गोलंदाज ठरला. कपिल देव यांनी १९८९ मध्ये येथे डावात पाच विकेट्स गेतल्या होत्या. सिराजने आजच्या लढतीपूर्वी ब्रिब्सेन येथे ७३ धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या. दरम्यान, रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल यांनी दुसऱ्या डावात आक्रमक फटकेबाजी करताना ४ षटकांत ४१ धावा फलकावर चढवल्या. 

Web Title: IND vs WI 2nd Test Live Marathi : After Kapil Dev ( 1989) Mohammed Siraj became a 2nd Indian Pacers to Pick 5fer at Port of Spain, India 41/0

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.