India Vs West Indies 2nd Test Live : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीतही यजमान वेस्ट इंडिजवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. विराट कोहलीचे शतक, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, यसश्वी जैस्वाल आणि आर अश्विन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ४३८ धावा उभ्या केल्या. विंडीजच्या जोमेल वॉरिकन व केमार रोच यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या आर अश्विनने ( R Ashwin) एक वेगळाच जुगाड केलेला पाहायला मिळाला. यापूर्वी त्याने तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये DRS वर DRS घेण्याचा जुगाड केला होता.
योगायोग! सचिन तेंडुलकर, Virat Kohli, २९ वे शतक अन् ब्रॅडमन यांच्याशी बरोबरी; ११ वर्षांपूर्वीचा Video
यशस्वी जैस्वाल ( ५७) आणि रोहित शर्मा ( ८०) यांच्या १३९ धावांच्या भागीदारीनंतर विराट कोहलीने भारताचा डाव सावरला. विराट आणि रवींद्र जडेजा या जोडीने पाचव्या २८६ चेंडूंत १५९ धावांची भागीदारी केली. विराट २०६ चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीने १२१ धावांवर रन आऊट झाला. जडेजाही १५२ चेंडूंत ६१ धावांवर झेलबाद झाला. इशान किशन ( २५) धावांवर माघारी परतल्यावर आर अश्विनने दमदार फिफ्टी ठोकली. अश्विन ५६ धावांवर बाद झाला अन् भारताने पहिल्या डावात ४३८ धावा केल्या.
डावाच्या १२७व्या षटकातील पाचव्या चेंडूवर वॉरिकनने भारताच्या मोहम्मद सिराजला LBW केले. मैदानावरील अम्पायरने त्याला नाबाद दिले असताना विंडीजने DRS घेतला अन् निर्णय बदलावा लागला. पण, अश्विन या निर्णयावर नाखूश दिसला अन् त्याने DRS वर पुन्हा DRS घेतला. चेंडू व बॅट यांच्यात संपर्क झाला असावा अशी शंका त्याला वाटली अन् त्याने तिसऱ्या अम्पायरला वेगळ्या अँगलने ही विकेट पाहायला भाग पाडले. पण, त्याचा फार उपयोग झाला नाही अन् सिराजला माघारी जावे लागले.
२००९ नंतर प्रथमच आशिया खंडाबाहेर भारताकडून पाच फलंदाजांनी एकाच डावात ५०+ धावा केल्या आहेत. २००९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध नेपियर कसोटीत गौतम गंभीर ( १३७), व्ही व्ही एस लक्ष्मण ( १२४), सचिन तेंडुलकर ( ६४), राहुल द्रविड (६२) आणि युवराज सिंग ( ५४) असा पराक्रम केला होता.