Join us  

इशान किशन Rishabh Pant च्या बॅटने खेळला, MS Dhoni चा विक्रम मोडला; कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी  

इशानने खणखणीत षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केले आणि पुढच्याच चेंडूवर रोहितने भारताचा दुसरा डाव घोषित केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 1:44 AM

Open in App

India vs West Indies 2nd Test Live Marathi : इशान किशनने पहिल्या कसोटीत १ धाव घेताच रोहित शर्माने डाव घोषित केला होता, परंतु आज रोहित यष्टिरक्षक-फलंदाजाच्या अर्धशतकासाठी थांबला. इशानने खणखणीत षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केले आणि पुढच्याच चेंडूवर रोहितने भारताचा दुसरा डाव घोषित केला. इशानला आज चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला गेला अन् त्याने तो सार्थ ठरवला. आशिया खंडाबाहेर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला इशान किशन हा फारूख इंजिनियर ( वि. इंग्लंड, लॉर्ड, १९७१) यांच्यानंतरचा दुसराच भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ठरला. इशानने आज MS Dhoniचाही विक्रम मोडला अन् कपिल देव, वीरेंद्र सेहवाग यांच्या पंक्तित स्थान पटकावले. 

World Record! १४६ वर्षांच्या कसोटी इतिहासात जे कुणालाच नाही जमले ते टीम इंडियाने करून दाखवले

भारताने पहिल्या डावातील १८३ धावांच्या आघाडीत दुसऱ्या डावात १८१  धावांची भर घालून वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ३६५ धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताच्या ४३८ धावांच्या प्रत्युत्तरात विंडीजचा संपूर्ण संघ २५५ धावांत माघारी परतला. मोहम्मद सिराजने ( Mohammed Siraj) ६० धावा देत ५ विकेट्स घेतल्या. चौथ्या दिवशी २६ धावांत विंडीजचे ५ फलंदाज माघारी परतले. भारताने दुसऱ्या डावात आक्रमक खेळ केला. रोहित शर्मा ( ५७)  व यशस्वी जैस्वाल ( ३८) यांनी दुसऱ्या डावात आक्रमक फटकेबाजी करताना ९८ धावांची सलामी दिली. इशानने चौथ्या क्रमांकावर येताना  ३४ चेंडूंत नाबाद ५२ धावा केल्या. शुबमन गिल २९ धावांवर नाबाद राहिला आणि भारताने २ बाद १८१ धावांवर दुसरा डाव घोषित केला. 

    

इशानने ३३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि कसोटी क्रिकेटमधील भारतीय यष्टिरक्षकाने झळकावलेले हे दुसरे जलद अर्धशतक ठरले. रिषभ पंतने २८ चेंडूंत ( वि. श्रीलंका, २०२२) अर्धशतक झळकावले होते, परंतु इशानने आज महेंद्रसिंग धोनीचा ( ३४ चेंडू वि. पाकिस्तान, २००६) विक्रम मोडला.  भारताकडून ३३ चेंडूंत अर्धशतक झळकावणारा तो चौथा फलंदाज ठरला. कपिल देव यांनी दोन वेळा ( वि. पाकिस्तान, १९७८ व वि. इंग्लंड, १९८२), हरभजन सिंग( वि. इंग्लंड, २००२) आणि वीरेंद्र सेहवाग ( वि. वेस्ट इंडिज, २००६) यांनी हा पराक्रम केला आहे. अपघातामुळे भारतीय संघाबाहेर असलेल्या रिषभ पंतची ( Rishabh Pant) बॅट घेऊन इशानने आज हे विक्रम केले, अशी चर्चा रंगली. कारण इशानच्या बॅटवर RP17 असे लिहिले गेले होते. 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजइशान किशनरिषभ पंतमहेंद्रसिंग धोनी
Open in App