इशान किशनचे पहिले कसोटी अर्धशतक अन् रोहित शर्माने केला डाव घोषित; विंडीजसमोर तगडे लक्ष्य

भारताच्या ४३८ धावांच्या प्रत्युत्तरात विंडीजचा संपूर्ण संघ २५५ धावांत माघारी परतला. मोहम्मद सिराजने ( Mohammed Siraj) ६० धावा देत ५ विकेट्स घेतल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 12:59 AM2023-07-24T00:59:07+5:302023-07-24T00:59:45+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI 2nd Test Live Marathi :Maiden Test fifty by Ishan Kishan, he smashed 50* runs from 33 balls; India need to defend 364 to win the Test series against West Indies by 2-0  | इशान किशनचे पहिले कसोटी अर्धशतक अन् रोहित शर्माने केला डाव घोषित; विंडीजसमोर तगडे लक्ष्य

इशान किशनचे पहिले कसोटी अर्धशतक अन् रोहित शर्माने केला डाव घोषित; विंडीजसमोर तगडे लक्ष्य

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies 2nd Test Live Marathi : भारताने पहिल्या डावातील १८३ धावांच्या आघाडीत दुसऱ्या डावात १८१  धावांची भर घालून वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ३६५ धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताच्या ४३८ धावांच्या प्रत्युत्तरात विंडीजचा संपूर्ण संघ २५५ धावांत माघारी परतला. मोहम्मद सिराजने ( Mohammed Siraj) ६० धावा देत ५ विकेट्स घेतल्या. चौथ्या दिवशी २६ धावांत विंडीजचे ५ फलंदाज माघारी परतले. भारताने दुसऱ्या डावात आक्रमक खेळ केला अन् इशान किशनने कसोटीतील त्याचे पहिले अर्धशतक झळकावले.  

रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! यशस्वी जैस्वालसह केला ९१ वर्षांच्या कसोटी इतिहासात न घडलेला पराक्रम


भारताच्या पहिल्या डावातील ४३८ धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने चांगली सुरुवात केली. कर्णधार क्रेग ब्रेथवेट ( ७५),  तेजनारायण चंद्रपॉल ( ३३), किर्म मॅकेंझी ( ३२), जेर्मेन ब्लॅकवूड ( २०) आणि जोशुआ डा सिल्व्हा ( १०) बाद झाल्याने तिसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडिजच्या ५ बाद २२९ धावा झाल्या होत्या. चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात विंडीजचा डाव गडगडला. एलिक अथानाझे ( ३७), जेसन होल्डर( १५), अल्झारी जोसेफ ( ४), केमार रोच ( ४) व शेनॉन गॅब्रिएल ( ०) हे झटपट बाद झाले.  रोहित शर्मा ( ५७)  व यशस्वी जैस्वाल ( ३८) यांनी दुसऱ्या डावात आक्रमक फटकेबाजी करताना ९८ धावांची सलामी दिली.   भारताला १०२ धावांवर दुसरा धक्का बसला, परंतु १२.२ षटकांत शतकी टप्पा ओलांडून भारताने इतिहास रचला. कसोटी क्रिकेट इतिहासातील ही एखाद्या संघाने सर्वात जलद १०० धावा करण्याची पहिलीच वेळ ठरली.  


इशान किशनला आज चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले अ् त्याने ३४ चेंडूंत नाबाद ५२ धावा केल्या. शुबमन गिल २९ धावांवर नाबाद राहिला आणि भारताने २ बाद १८१ धावांवर दुसरा डाव घोषित केला. आशिया खंडाबाहेर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला इशान किशन हा फारूख इंजिनियर ( वि. इंग्लंड, लॉर्ड, १९७१) यांच्यानंतरचा दुसराच भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ठरला. नरेन ताम्हाणे ( वि. ऑस्ट्रेलिया, चेन्नई १९५६), बुधी कुंदरन ( वि. ऑस्ट्रेलिया, चेन्नई १९६०), सय्यद किरमानी ( वि. पाकिस्तान, कराची १९७८), नयन मोंगिया ( वि. ऑस्ट्रेलिया, मुंबई २००१) यांनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. पार्थिव पटेल हा एकमेव यष्टिरक्षक आहे ज्याने २०१८मध्ये सलामीला फलंदाजी केलीय. 

Web Title: IND vs WI 2nd Test Live Marathi :Maiden Test fifty by Ishan Kishan, he smashed 50* runs from 33 balls; India need to defend 364 to win the Test series against West Indies by 2-0 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.