India vs West Indies 2nd Test Live Marathi : फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर वेस्ट इंडिजनेही चांगली फटकेबाजी केली. भारताच्या गोलंदाजांना विकेट मिळवण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. त्यात क्षेरत्ररक्षकांनी दिलेल्या ओव्हर थ्रोमुळे गोलंदाज अधिक फ्रस्ट्रेट झालेले दिसले. आर अश्विनने विंडीज कर्णधार क्रेग ब्रेथवेटची महत्त्वपूर्ण विकेट मिळवून भारताला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली. त्यानंतर अजिंक्य रहाणेने स्लीपमध्ये घेतलेला अप्रतिम झेल अन् मोहम्मद सिराजच्या चेंडूवर उडालेला जोशुआचा त्रिफळा, याने टीम इंडियाचे कमबॅक झाले. पण, विंडीजने निम्मी लढाई जिंकली आहे.
अजिंक्य रहाणेने अफलातून झेल घेतला, Mumbai Indians चे अज्जूसाठी खास ट्विट, Video
भारताने पहिल्या डावात ४३८ धावा उभ्या केल्या. ब्रेथवेट व तेजनारायण चंद्रपॉल ( ३३) यांनी ७१ धावांची भागीदारी केली. रवींद्र जडेजाने दुसऱ्या दिवशी विंडीजला पहिला धक्का दिला होता. त्यात तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात पदार्पणवीर मुकेश कुमारने विंडीजची दुसरी विकेट घेतली. ब्रेथवेटसह ४६ धावा जोडणाऱ्या किर्म मॅकेंझीला ( ३२) त्याने माघारी पाठवले. अश्विनला २५ षटकं टाकूनही विकेट मिळवता आली नव्हती, परंतु त्याने त्याच्या २६व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ब्रेथवेटचा त्रिफळा उडवला. ब्रेथवेट २३५ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारांसह ७५ धावांवर माघारी परतला.
टी ब्रेकनंतर रवींद्र जडेजाने आणखी एक महत्त्वाची विकेट मिळवून दिली. जेर्मेन ब्लॅकवूडला ( २०) अजिंक्य रहाणेने अविश्वसनीय झेल घेतला. रहाणेने डाव्या बाजूला झेप घेत अफलातून कॅच घेतली. पावसाच्या एन्ट्रीमुळे २-३ वेळा सामना थांबवावा लागला. मोहम्मद सिराजने ९८व्या षटकात जोशुआ डा सिल्व्हाचा ( १०) त्रिफळा उडवला अन् विंडीजचा निम्मा संघ २०८ धावांवर माघारी परतला होता. एलिक अथानाझे ( ३७*) व अनुभवी जेसन होल्डर ( ११*) यांनी तिसऱ्या दिवसअखेर खिंड लढवली. वेस्ट इंडिजच्या ५ बाद २२८ धावा झाल्या आहेत आणि अजूनही ते २१० धावांनी पिछाडीवर आहेत.
Web Title: IND vs WI 2nd Test Live Marathi : Stumps on Day 2; West Indies 228/5 & trail by 210 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.