Join us  

IND vs WI 2nd Test : २५ षटकांनंतर आर अश्विनचा चेंडू असा वळला, विंडीज कर्णधाराचा 'दांडा' उडाला, Video

India vs West Indies 2nd Test  Live Marathi : फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांचाही कस लागला...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 11:40 PM

Open in App

India vs West Indies 2nd Test  Live Marathi : फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांचाही कस लागला... पहिल्या कसोटीत १२ विकेट्स घेणाऱ्या आर अश्विनला ( R Ashwin) दुसऱ्या सामन्यात पहिली विकेट मिळवण्यासाठी २५.४ षटकं फेकावी लागली. भारताच्या पहिल्या डावातील ४३८ धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजनेही चांगला खेळ केला. कर्णधार क्रेग ब्रेथवेट भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना दिसला, परंतु अश्विनने एकच चेंडू असा भारी वळवला की भारताला महत्त्वाचा मोहरा मिळाला. 

भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीतही यजमान वेस्ट इंडिजवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. विराट कोहलीचे ( १२१) शतक, रोहित शर्मा ( ८०) , रवींद्र जडेजा ( ६१) , यसश्वी जैस्वाल ( ५७) आणि आर अश्विन ( ५६ ) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ४३८ धावा उभ्या केल्या. विंडीजच्या क्रेग ब्रेथवेट व तेजनारायण चंद्रपॉल ( ३३) यांनी आश्वासक सुरूवात केली. या दोघांनी ३४.२ षटकं खेळून काढताना ७१ धावांची भागीदारी केली. रवींद्र जडेजाने ही भागीदारी तोडली. ब्रेथवेट आणि  किर्म मॅकेंझी यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४६ धावा जोडल्या. तिसऱ्या दिवशी मुकेश कुमारने मॅकेंझीला ( ३२) माघारी पाठवले. विंडीजला ११७ धावांवर दुसरा धक्का बसला आणि पावसाच्या आगमनामुळे खेळ थांबला होता. 

ब्रेथवेटने अर्धशतक झळकावून भारताची डोकेदुखी वाढवली. खेळपट्टी गोलंदाजांना काहीच साथ देत नव्हती अन् विंडीजच्या फलंदाजांकडून चूक होण्याची भारतीय खेळाडू प्रतीक्षा करताना दिसले. अश्विनला २५ षटकं टाकूनही विकेट मिळवता आली नव्हती, परंतु त्याने त्याच्या २६व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर विंडीजचा कर्णधार ब्रेथवेटला चकवले. अश्विनने टाकलेला चेंडू बॅट अन् पॅडमधून यष्टिंवर आदळला. ब्रेथवेड २३५ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारांसह ७५ धावांवर माघारी परतला.  विंडीजला १५७ धावांवर तिसरा धक्का बसला. 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजआर अश्विन
Open in App