Join us  

IND vs WI 2nd Test : थांबला, तिथे घात झाला! चोरटी धाव घेण्याच्या नादात विराट कोहली रन आऊट झाला

India Vs West Indies 2nd Test Live : विराट कोहलीने ५००वा आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावून इतिहास घडविला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 8:58 PM

Open in App

India Vs West Indies 2nd Test Live : विराट कोहलीने ५००वा आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावून इतिहास घडविला. ५०० आंतरराष्ट्रीय सामन्यांत सर्वाधिक ७६ शतकांचा विक्रम त्याने नावावर करताना सचिन तेंडुलकरला ( ७५) मागे टाकले. ५००व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला. कसोटी क्रिकेटमधील हे त्याचे २९वे शतक ठरले. ५५ महिन्यानंतर त्याने परदेशात कसोटी शतक झळकावले. पण, त्याच्या या अविश्वसनीय खेळीचा शेवट चुकीच्या पद्धतीने झाला. एक धाव घेण्याचा मोह विराटला आवरता आला नाही आणि त्याची विकेट पडली.  यशस्वी जैस्वाल ( ५७) आणि रोहित शर्मा ( ८०) यांच्या १३९ धावांच्या भागीदारीनंतर विराट कोहलीने भारताचा डाव सावरला. दुसऱ्या सत्रात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी ६१ धावांत ४ विकेट घेत पुनरागमन केले होते. पण, विराट आणि रवींद्र जडेजा या जोडीने पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून भारताला पुन्हा फ्रंटसीटवर आणले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराटने पाचवे स्थान पटकावले. सचिन तेंडुलकर ( ३४३५७), कुमार संगकारा ( २८०१६), रिकी पाँटिंग ( २७४८३), माहेला जयवर्धने ( २५९५७) आणि विराट ( २५५३६*) असे टॉप पाच फलंदाज आहेत. पहिल्या दिवसअखेर भारताने  ८४ षटकांत ४ बाद २८८ धावा केल्या. विराट १६१ चेंडूंत ८ चौकारांसह ८७ धावांवर, तर जडेजा ३६ धावांवर नाबाद होता. 

या दोघांनी दुसऱ्या दिवसाची सावध सुरूवात केली. विराटने १८० चेंडूंत शतक पूर्ण करण्यासाठी ११ चौकार व १ षटकार लगावला. विराटच्या शतकानंतर जडेजानेही अर्धशतक पूर्ण केले आणि या दोघांनी १५० धावांची भागीदारी पूर्ण केली. पण, २८६ चेंडूंतील १५९ धावांच्या भागीदारीला ९९व्या षटकात नजर लागली. २०६ चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीने १२१ धावा करणारा विराट कोहली रन आऊट झाला. विराट कसोटी कारकीर्दित केवळ तीन वेळा रन आऊट झाला आहे.  22(62) v Australia, 2012 (Adelaide Oval)74(180) v Australia, 2020 (Adelaide Oval)121(206) v West Indies, 2023 (Trinidad)*

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहलीरवींद्र जडेजा
Open in App