IND vs WI 2nd Test : वेस्ट इंडिजचा पलटवार; भारताच्या पहिल्या डावात ४३८ धावा 

India Vs West Indies 2nd Test Live : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीतही यजमान वेस्ट इंडिजवर निर्विवाद वर्चस्व गाजवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 10:17 AM2023-07-22T10:17:59+5:302023-07-22T10:18:22+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI 2nd Test Live Marathi : West Indies 86/1 on Day 2 Stumps! They're trailing by 352 more runs, an exceptional session for West Indies. They lost just 1 wicket. | IND vs WI 2nd Test : वेस्ट इंडिजचा पलटवार; भारताच्या पहिल्या डावात ४३८ धावा 

IND vs WI 2nd Test : वेस्ट इंडिजचा पलटवार; भारताच्या पहिल्या डावात ४३८ धावा 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Vs West Indies 2nd Test Live : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीतही यजमान वेस्ट इंडिजवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. विराट कोहलीचे शतक, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, यसश्वी जैस्वाल आणि आर अश्विन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ४३८ धावा उभ्या केल्या. विंडीजच्या जोमेल वॉरिकन व केमार रोच यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. विंडीजच्या क्रेग ब्रेथवेट व तेजनारायण चंद्रपॉल यांनी आश्वासक सुरूवात केली. या दोघांनी ३४.२ षटकं खेळून काढताना ७१ धावांची भागीदारी केली. रवींद्र जडेजाने ही भागीदारी तोडली.  चंद्रपॉल ( ३३) माघारी परतल्यानंतर ब्रेथवेट ( ३७*) व किर्म मॅकेंझी ( १४*) यांनी दिवसअखेर १ बाद ८६ धावांपर्यंत संघाला पोहोचवले. 


यशस्वी जैस्वाल ( ५७) आणि रोहित शर्मा ( ८०) यांच्या १३९ धावांच्या भागीदारीनंतर विराट आणि रवींद्र जडेजा या जोडीने पाचव्या २८६ चेंडूंत १५९ धावांची भागीदारी केली. विराट २०६ चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीने १२१ धावांवर रन आऊट झाला. जडेजाही १५२ चेंडूंत ६१ धावांवर झेलबाद झाला. इशान किशन ( २५) धावांवर माघारी परतल्यावर आर अश्विनने दमदार फिफ्टी ठोकली. अश्विन ५६ धावांवर बाद झाला अन् भारताने पहिल्या डावात ४३८ धावा केल्या.   


२००९ नंतर प्रथमच आशिया खंडाबाहेर भारताकडून पाच फलंदाजांनी एकाच डावात ५०+ धावा केल्या आहेत. २००९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध नेपियर कसोटीत गौतम गंभीर ( १३७), व्ही व्ही एस लक्ष्मण ( १२४), सचिन तेंडुलकर ( ६४), राहुल द्रविड (६२) आणि युवराज सिंग ( ५४) असा पराक्रम केला होता. 

Web Title: IND vs WI 2nd Test Live Marathi : West Indies 86/1 on Day 2 Stumps! They're trailing by 352 more runs, an exceptional session for West Indies. They lost just 1 wicket.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.