IND vs WI 2nd Test : अजिंक्य रहाणेने अफलातून झेल घेतला, Mumbai Indians चे अज्जूसाठी खास ट्विट, Video

India vs West Indies 2nd Test  Live Marathi : चांगल्या सुरुवातीनंतर वेस्ट इंडिजच्या डावाला गळती लागल्याचे तिसऱ्या दिवशी पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 01:08 AM2023-07-23T01:08:09+5:302023-07-23T01:08:45+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI 2nd Test  Live Marathi : What an outstanding catch by Ajinkya Rahane in the slips, Ravindra Jadeja  gets Jermaine blackwood, Mumbai Indians special tweet for Ajju, Video | IND vs WI 2nd Test : अजिंक्य रहाणेने अफलातून झेल घेतला, Mumbai Indians चे अज्जूसाठी खास ट्विट, Video

IND vs WI 2nd Test : अजिंक्य रहाणेने अफलातून झेल घेतला, Mumbai Indians चे अज्जूसाठी खास ट्विट, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies 2nd Test  Live Marathi : चांगल्या सुरुवातीनंतर वेस्ट इंडिजच्या डावाला गळती लागल्याचे तिसऱ्या दिवशी पाहायला मिळाले. फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांचाही कस लागला. भारताच्या पहिल्या डावातील ४३८ धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजनेही चांगला खेळ केला. कर्णधार क्रेग ब्रेथवेटने भारतीय गोलंदाजांची परिक्षा घेतली, परंतु आर अश्विनने ही महत्त्वाची विकेट मिळवून दिली. त्यानंतर रवींद्र जडेजाची ( Ravindra Jadeja) फिरकी चालली अन् अजिंक्य रहाणेने ( Ajinkya Rahane) स्लीपमध्ये अप्रतिम झेल टिपला. 

२५ षटकांनंतर आर अश्विनचा चेंडू असा वळला, विंडीज कर्णधाराचा 'दांडा' उडाला, Video


भारताने पहिल्या डावात ४३८ धावा उभ्या केल्या. विंडीजच्या क्रेग ब्रेथवेट व तेजनारायण चंद्रपॉल ( ३३) यांनी  ३४.२ षटकं खेळून काढताना ७१ धावांची भागीदारी केली. रवींद्र जडेजाने ही भागीदारी तोडली. ब्रेथवेट आणि  किर्म मॅकेंझी यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४६ धावा जोडल्या. तिसऱ्या दिवशी मुकेश कुमारने मॅकेंझीला ( ३२) माघारी पाठवले. ब्रेथवेटने अर्धशतक झळकावून भारताची डोकेदुखी वाढवली. खेळपट्टी गोलंदाजांना काहीच साथ देत नव्हती अन् विंडीजच्या फलंदाजांकडून चूक होण्याची भारतीय खेळाडू प्रतीक्षा करताना दिसले. 


अश्विनला २५ षटकं टाकूनही विकेट मिळवता आली नव्हती, परंतु त्याने त्याच्या २६व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर विंडीजचा कर्णधार ब्रेथवेटला चकवले. अश्विनने टाकलेला चेंडू बॅट अन् पॅडमधून यष्टिंवर आदळला. ब्रेथवेड २३५ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारांसह ७५ धावांवर माघारी परतला.  विंडीजला १५७ धावांवर तिसरा धक्का बसला. टी ब्रेकनंतर रवींद्र जडेजाने आणखी एक महत्त्वाची विकेट मिळवून दिली. जेर्मेन ब्लॅकवूडला ( २०) अजिंक्य रहाणेने अविश्वसनीय झेल घेतला. रहाणेने डाव्या बाजूला झेप घेत अफलातून कॅच घेतली. विंडीजला १७८ धावांवर चौथा धक्का बसला. 


Web Title: IND vs WI 2nd Test  Live Marathi : What an outstanding catch by Ajinkya Rahane in the slips, Ravindra Jadeja  gets Jermaine blackwood, Mumbai Indians special tweet for Ajju, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.