रोहित शर्माने रचला इतिहास, सुनील गावस्करांना टाकले मागे; यशस्वीनेही अर्धशतक झळकावले

India Vs West Indies 2nd Test Live : वेस्ट इंडिजचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेट याने नाणेफेक जिंकून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणारा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 09:29 PM2023-07-20T21:29:54+5:302023-07-20T21:30:15+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI 2nd Test Live Update : History - Rohit Sharma becomes 2nd fastest Indian to have completed 2000 runs as opener in Test Cricket, yashasvi jaiswal scored fifty, India 118/0  | रोहित शर्माने रचला इतिहास, सुनील गावस्करांना टाकले मागे; यशस्वीनेही अर्धशतक झळकावले

रोहित शर्माने रचला इतिहास, सुनील गावस्करांना टाकले मागे; यशस्वीनेही अर्धशतक झळकावले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Vs West Indies 2nd Test Live : वेस्ट इंडिजचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेट याने नाणेफेक जिंकून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणारा निर्णय घेतला. गोलंदाजांना अजिबात मदत न मिळणाऱ्या खेळपट्टीवर विंडीजने भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. पहिल्या कसोटीत २२९ धावांची विक्रमी भागीदारी करणाऱ्या रोहित शर्मायशस्वी जैस्वाल जो़डीने दुसऱ्या कसोटीतही शतकी भागीदारी केली. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावताना पहिल्या सत्रात बिनबाद ११८ धावा केल्या आहेत. हिटमॅन रोहित शर्माने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. 

भारताला Playing XI मध्ये बदल करायचा नव्हता, पण...! रोहितने सांगितलं शार्दूल ठाकूरला बसवण्याचं कारण

भारत-वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना आजपासून सुरू होतोय... IND vs WI यांच्यामधील हा १००वा कसोटी सामना आहे. १९४८ ते २००२ या कालावधीत भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ७५ कसोटी सामने खेळले गेले आणि त्यात विंडीजने ३० विजयासह निर्विवाद वर्चस्व गाजवले, तर भारताला केवळ ८ सामने जिंकता आले. पण, २००२ नंतर ते आतापर्यंत झालेल्या २४ कसोटींत भारताने १५ विजय मिळवले, तर विंडीजला अद्याप विजयाचे खाते उघडता आले नाही. विंडीजच्या रहकिम कोर्नवॉलने चेस्ट इन्फेक्शनमुळे कसोटीतून माघार घेतली. भारताने आजच्या सामन्यात मुकेश कुमारला ( Mukesh Kumar) पदार्पणाची संधी दिली गेली.  ( IND vs WI 2nd Test Live Scoreboard)


गोलंदाजांना खेळपट्टीकडून फार मदत मिळताना दिसत नव्हती आणि रोहित व यशस्वी संयमाने खेळले. ४ धावांवर असताना अल्झारी जोसेफचा बाहेर जाणारा चेंडू यशस्वीने छेडला अन् गलीमध्ये उभ्या असलेल्या खेळाडूच्या दिशेने गेला. पण, हा झेल टिपता आला नाही. रोहित-यशस्वी जोडीला रोखणं विंडीजला सोपं नक्कीच नव्हतं. या दोघांनी फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलला. रोहितने अर्धशतक पूर्ण केले अन् यशस्वीसह शतकी भागीदारीही पूर्ण केली. रोहितने आज कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून २००० धावा पूर्ण केल्या. भारताकडून सर्वात कमी इनिंग्जमध्ये २००० धावा करणारा तो दुसरा सलामीवीर ठरला. वीरेंद्र सेहवागने ३९ इनिंग्जमध्ये हा टप्पा ओलांडलेला. रोहितला ४० डाव खेळावे लागले आणि त्याने सुनील गावस्कर ( ४३), गौतम गंभीर ( ४३) यांचे विक्रम मोडले.  



 

Web Title: IND vs WI 2nd Test Live Update : History - Rohit Sharma becomes 2nd fastest Indian to have completed 2000 runs as opener in Test Cricket, yashasvi jaiswal scored fifty, India 118/0 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.