Join us  

टॅक्सी चालकाच्या मुलाचं टीम इंडियातून पदार्पण; १००व्या कसोटीत वेस्ट इंडिजला मोठा धक्का

India Vs West Indies 2nd Test Live : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना आजपासून सुरू होतोय...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 7:09 PM

Open in App

India Vs West Indies 2nd Test Live : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना आजपासून सुरू होतोय... IND vs WI यांच्यामधील हा १००वा कसोटी सामना आहे. भारतीय संघाने पहिली कसोटी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे आणि दुसरी कसोटी जिंकून शंभरावी कसोटी ऐतिहासिक बनवण्याचा त्यांचा निर्धार आहे. तेच यजमान विंडीज या कसोटीत पुनरागमनासाठी प्रयत्नशील असणार आहेत. यशस्वी जैस्वालने पहिल्या कसोटीत विक्रमी कामगिरी करून आपले स्थान पक्के केले. 

१९४८ ते २००२ या कालावधीत भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ७५ कसोटी सामने खेळले गेले आणि त्यात विंडीजने ३० विजयासह निर्विवाद वर्चस्व गाजवले, तर भारताला केवळ ८ सामने जिंकता आले. पण, २००२ नंतर ते आतापर्यंत झालेल्या २४ कसोटींत भारताने १५ विजय मिळवले, तर विंडीजला अद्याप विजयाचे खाते उघडता आले नाही. विंडीजला ही कसोटी सुरू होण्यापूर्वीच धक्का बसला आहे आणि त्यांचा वजनदार खेळाडू रहकिम कोर्नवॉलने चेस्ट इन्फेक्शनमुळे दुसर्या कसोटीतून माघार घेतली आहे. ( Rahkeem Cornwall has been ruled out of the 2nd Test due to a chest infection.) 

आजच्या सामन्यात मुकेश कुमारला ( Mukesh Kumar) पदार्पणाची संधी दिली गेली.  मुकेशने ३९ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १४९, २४ लिस्ट ए क्रिकेटमध्ये २६ आणि ३३ ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ३२ विकेट्स घेतल्या आहेत. शार्दूल ठाकूरच्या जागी मुकेशला संधी दिली गेली आहे.

कोण आहे मुकेश कुमार?बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारचे वडील कोलकात्यात टॅक्सी चालवायचे. मुकेशच्या वडिलांना क्रिकेटचा तिरस्कार होता आणि या खेळात नाव कमावण्यासाठी मुकेशकडे फक्त एक वर्ष होते. २००८-०९ मध्ये बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यात 'प्रतिभा की खोज' नावाचा कसोटी सामना आयोजित करण्यात आला होता. इथेच मुकेश कुमारच्या प्रयत्नाची सुरुवात झाली होती. २५-२५ षटकांच्या सामन्यात मुकेश कुमारने सात सामन्यांत ३४ बळी घेतले. एका वर्षानंतर त्याने बीसीसीआयने आयोजित केलेल्या असोसिएट स्पर्धेत बिहार अंडर-19 संघाचे प्रतिनिधित्व केले.

स्थानिक गोपालगंज जिल्हा क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अमित सिंग याने मुकेश कुमारची प्रतिभा प्रथमच पाहिली होती. तो रोज 30 किलोमीटर सायकलिंग करून क्रिकेट खेळायला यायचा. मुकेशचे गाव गोपालगंजपासून १५ किलोमीटर दूर होते. तो त्याच्या पायाचे स्नायू मजबूत करण्यासाठी खूप धावायचा. सैन्यात भरती होण्यासाठी देखील तो प्रयत्न करत होता. 

मुकेश कुमार २०१२ मध्ये कोलकाता येथे वडिलांना त्यांच्या टॅक्सी व्यवसायात मदत करण्यासाठी गेला. कोलकात्यातही मुकेशने वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन दुसऱ्या लीगमध्ये ४००-५०० रुपयांत स्थानिक सामने खेळायला सुरुवात केली. २०१४ मध्ये मुकेश आणखी एका कसोटी सामन्यात सामील झाला, ज्याने त्याचे आयुष्य बदलले. बंगालच्या बुची बाबू स्पर्धेसाठी मुकेश कुमारची निवड झाली तेव्हा त्याच्याकडे क्रिकेट किट देखील नव्हते. तेव्हा मनोज तिवारी यांनी त्याला बॅट, पॅड आणि हातमोजे दिले होते.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्मा
Open in App