Join us  

IND vs WI 2nd Test : विराट कोहलीसाठी हा सामना आहे खास; १५० वर्षांच्या इतिहासात १० खेळाडूंना जमलाय हा पराक्रम

भारतीय संघाने पहिली कसोटी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे आणि दुसरी कसोटी जिंकून शंभरावी कसोटी ऐतिहासिक बनवण्याचा त्यांचा निर्धार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 7:36 PM

Open in App

India Vs West Indies 2nd Test Live : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना आजपासून सुरू होतोय... IND vs WI यांच्यामधील हा १००वा कसोटी सामना आहे. भारतीय संघाने पहिली कसोटी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे आणि दुसरी कसोटी जिंकून शंभरावी कसोटी ऐतिहासिक बनवण्याचा त्यांचा निर्धार आहे. तेच यजमान विंडीज या कसोटीत पुनरागमनासाठी प्रयत्नशील असणार आहेत. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजचा सामना हा विराट कोहलीचा ( Virat Kohli) ५०० वा आंतरराष्ट्रीय सामना आहे आणि त्याच्यासह केवळ १० खेळाडूंना हा टप्पा ओलांडता आलाय.

 

४९९ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावाविराट कोहली - २५४६१रिकी पाँटिंग - २४९९१सचिन तेंडुलकर - २४८३९  

विराट कोहलीचा प्रवास७५ शतकं १३१ अर्धशतकं२५४६१ धावा२५२२ चौकार२७९ षटकार५३.४८ सरासरी ३३ वेळा शून्यावर बाद६३ मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार२० मॅन ऑफ दी सीरिज पुरस्कार 

भारताकडून सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि महेंद्रसिंग धोनीने हा पल्ला गाठलाय. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने सचिन तेंडुलकर - ६६४माहेला जयवर्धने - ६५२कुमार संगकारा - ५९४सनथ जयसुर्या - ५८६रिकी पाँटिंग - ५६०महेंद्रसिंग धोनी - ५३८शाहिद आफ्रिदी - ५२४जॅक कॅलिस - ५१९राहुल द्रविड - ५०९विराट कोहली - ५००

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहली
Open in App