विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! क्रिकेटच्या इतिहासात असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज

५०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या विराट कोहली व रवींद्र जडेजा या जोडीने भारताचा डाव सावरला.  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 02:00 AM2023-07-21T02:00:03+5:302023-07-21T02:00:24+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI 2nd Test Live Update : Virat Kohli becomes the first batsman to score a half century in his 500th game.  | विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! क्रिकेटच्या इतिहासात असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज

विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! क्रिकेटच्या इतिहासात असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Vs West Indies 2nd Test Live : यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांच्या १३९ धावांच्या भागीदारीनंतर दुसऱ्या कसोटीचे दुसरे सत्र वेस्ट इंडिजने गाजवले. विंडीजच्या गोलंदाजांनी पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात भारताला ६१ धावांत ४ धक्के दिले. ५०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या विराट कोहली व रवींद्र जडेजा या जोडीने भारताचा डाव सावरला.  

अजिंक्य रहाणेचा उडाला दांडा! वेस्ट इंडिजचे जबरदस्त कमबॅक, ६१ धावांत ४ फलंदाज पाठवले माघारी


लंच ब्रेकनंतर विंडीजने मॅच फिरवली. जेसन होल्डरने भारताला पहिला धक्का दिला. मागील सामन्यातील शतकवीर  यशस्वी ७४ चेंडूंत ९ चौकार व १ षटकार मारून ५७ धावांवर बाद झाला. केमार रोचने विंडीजला दुसरे यश मिळवून देताना शुबमन गिलला १० धावांवर बाद केले. त्यानंतर रोहितही १४३ धावांच ९ चौकार व २ षटकारांसह ८० धावांवर त्रिफळाचीत झाला. बिनबाद १३९ वरून भारताची अवस्था ३ बाद १५५ अशी केली. अजिंक्य रहाणे व विराट कोहली यांनी संयमी खेळ केला. विंडीजच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांच्या धावांची गती संथ केली. १८ महिन्यानंतर भारतीय संघात परतलेला अजिंक्य पुन्हा अपयशी ठरला. शेनन गॅब्रिएलच्या अप्रतिम चेंडूवर अजिंक्यचा ( ८ ) त्रिफळा उडाला. ( IND vs WI 2nd Test Live Scoreboard)



५००वी आंतरराष्ट्रीय मॅच खेळणाऱ्या विराटने सुरुवातीला संयमी खेळ केला, परंतु हळूहळू त्याने धावांचा वेग वाढवला. त्याने मारलेले कव्हर ड्राईव्ह डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. विराटने सलग दुसऱ्या कसोटीत अर्धशतक पूर्ण केले. कसोटीतील हे त्याचे ३० वे अर्धशतक ठरले. ५००व्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०+ धावा करणारा विराट जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. कसोटीत विराटने १८७ इनिंग्जमध्ये ४९.१८च्या सरासरीने ८६०७* धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ३० अर्धशतकं आणि २८ शतकं आहेत. 

Web Title: IND vs WI 2nd Test Live Update : Virat Kohli becomes the first batsman to score a half century in his 500th game. 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.