आमच्याकडे काय गिफ्ट मागतोस? रोहित शर्माचा सवाल अन् लगेच ठेवली डिमांड  Video

IND vs WI 2nd Test : टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे आणि पहिल्या कसोटीत भारताने एक डाव आणि १४१ धावांनी विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 11:50 AM2023-07-19T11:50:54+5:302023-07-19T11:51:13+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI 2nd Test : Rohit Sharma asking Ishan Kishan what he wants on his birthday, Video  | आमच्याकडे काय गिफ्ट मागतोस? रोहित शर्माचा सवाल अन् लगेच ठेवली डिमांड  Video

आमच्याकडे काय गिफ्ट मागतोस? रोहित शर्माचा सवाल अन् लगेच ठेवली डिमांड  Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs WI 2nd Test : टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे आणि पहिल्या कसोटीत भारताने एक डाव आणि १४१ धावांनी विजय मिळवला. २० जुलैपासून दुसऱ्या कसोटीला सुरुवात होणार आहे. टीम इंडियाने १८जुलै रोजी पहिल्या कसोटी सामन्यात पदार्पण करणाऱ्या इशान किशनचा २५ वा वाढदिवस साजरा केला. अशा परिस्थितीत दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी रोहितला जेव्हा इशानचा वाढदिवस आणि त्याला काय गिफ्ट देणार असे विचारण्यात आले तेव्हा त्याने अतिशय मजेशीर उत्तर दिले.


त्रिनिदादमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत रोहितला विचारण्यात आले की, १८ जुलैला इशानच्या वाढदिवसानिमित्त टीम इंडियाने त्याला काय गिफ्ट दिले? यावर रोहितने तिथे उपस्थित इशानला विचारले की, भाई, तुला तुझ्या वाढदिवसाला काय गिफ्ट हवे आहे. तुझ्याकडे सर्व काही आहे. रोहितने हे सांगताच सगळे हसायला लागले. नंतर रोहित पुढे म्हणाला की, इशानला वाढदिवसाचे काय गिफ्ट द्यायचे. हा माझा निर्णय नसून संपूर्ण संघाचा निर्णय असेल. काय द्यायचे हे आम्ही मिळून ठरवू.


रोहितने पुढे इशानकडून रिटर्न गिफ्ट मागितले. रोहितने ईशानला रिटर्न गिफ्ट म्हणून वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक झळकावण्यास सांगितले आहे. रिटर्न गिफ्टमध्ये आम्हाला शतक हवे आहे, असे तो म्हणाला.


वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारानेही इशानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर इशानने आपल्या टीमसोबत केक कापून सेलिब्रेशन केले. रोहित शर्माने रिटर्न गिफ्ट म्हणून इशान किशनकडून शतक मागितल्याने हे स्पष्ट झाले आहे की पुढील सामन्यातही ईशान टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असणार आहे.  

Web Title: IND vs WI 2nd Test : Rohit Sharma asking Ishan Kishan what he wants on his birthday, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.