Join us  

IND vs WI 3rd ODI Live Updates : भारतीय संघाचा ऐतिहासिक मालिका विजय, शिखर धवनच्या नेतृत्वावर नोंदवला गेला मोठा विक्रम 

India vs West Indies 3rd ODI Live Updates : पावसामुळे शुबमन गिलचे ( Shubman Gill) वन डेतील पहिले शतक पूर्ण होऊ शकले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 3:14 AM

Open in App

India vs West Indies 3rd ODI Live Updates : पावसामुळे शुबमन गिलचे ( Shubman Gill) वन डेतील पहिले शतक पूर्ण होऊ शकले नाही. गिलला ९८ धावांवर नाबाद रहावे लागले, परंतु त्याने अनेक विक्रम नोंदवले. वेस्ट इंडिजसमोर ३५ षटकांत २५७ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवले गेले. वेस्ट इंडिजचा संघ हे टार्गेट पूर्ण करण्यात अपयशी ठरला अन् भारताने वन डे मालिका ३-० अशी जिंकली. वेस्ट इंडिजविरुद्ध ३-० असा मालिका विजय मिळवणारा शिखर धवन हा भारताचा पहिलाच कर्णधार ठरला. भारताने प्रथमच विंडीजला त्यांच्या घरी क्लिन स्वीप दिला आहे. 

शिखर धवन ( ५८) व शुबमन गिल या जोडीने ११३ धावांची भागीदारी केली. पावसामुळे हा सामना ४०-४० षटकांचा खेळवण्याचा निर्णय झाला. गिल व श्रेयस अय्यर यांनी ५८ चेंडूंत ८६ धावांची भागीदारी केली. श्रेयस ४४ ( ३४ चेंडू, ४ चौकार व १ षटकार) धावांवर झेलबाद झाला. सूर्यकुमार यादव ( ८)  लगेच माघारी परतला. प्रथम पाऊस पडण्यापूर्वी गिलने ६५ चेंडूंत ५१ धावा केल्या होत्या, परंतु पावसाच्या बॅटींगनंतर गिलची आतषबाजी सुरू जाली. त्याने १६ चेंडूंत ३१ धावा चोपल्या. ८० धावांचा टप्पा ओलांडल्यावर पुढील १७ चेंडूंत त्याने १६ धावा केल्या.  ९८ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह गिल ९८ धावांवर नाबाद राहिला. 

 

प्रत्युत्तरात, दुसऱ्याच षटकात मोहम्मद सिराजने पहिल्या चेंडूवर कायले मेयर्सचा ( ०) त्रिफळा उडवला आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर शामराह ब्रुक्सला (०) पायचीत केले. सिराजच्या धक्क्यामुळे विंडीजची अवस्था २ बाद ० धावा अशी झाली होती. शे होप व ब्रेंडन किंग यांनी वेस्ट इंडिजचा डाव सावरताना झटपट धावा केल्या. पण, पुन्हा एकदा गोलंदाजीत बदल कामी आला. युजवेंद्र चहलने १०व्या षटकाय शे होपला ( २२) बाद केले. संजू सॅमसनने चपळाईने स्टम्पिंग करून ही महत्त्वाची विकेट मिळवून दिली. त्यानंतर अक्षर पटेलने भारताला आणखी एक यश मिळवून देताना ब्रेंडन किंगचा ( ४२) त्रिफळा उडवला. वेस्ट इंडिजची अवस्था ४ बाद ७४ अशी झाली होती.

कर्णधार निकोलस पूरन ( ४२) एकटा संघर्ष करताना दिसला. बाकी फलंदाज अपयशी ठरले. प्रसिद्ध कृष्णाने पूरनची विकेट घेत विंडीजला मोठा धक्का दिला. त्यानंतर शार्दूल ठाकूर व युजवेंद्र चहलने धक्के दिले. चहलने १७ धावांत ४ विकेट्स घेत वेस्ट इंडिजचा संघ २६ षटकांत १३७ धावांवर माघारी पाठवला. भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार ११९ धावांनी ही मॅच जिंकली. 

शिखर धवनचा विक्रम... यापूर्वी भारतीय संघाने वेस्टइंडिजच्या भूमीवर ९ एकदिवसीय मालिका खेळल्या होत्या, ज्यातील चार मालिका वेस्टइंडिजने तर पाच मालिका भारताने जिंकल्या आहेत. भारतीय संघाने २०१७ मध्ये ३-१ ने मालिका जिंकून सर्वोत्तम कामगिरी केली होती. भारतीय संघाने तब्बल ३९ वर्षांपूर्वी आपली पहिली मालिका विंडीजच्या धरतीवर खेळली होती. 

वेस्टइंडिजमध्ये झालेल्या एकदिवसीय मालिका

१९८३ वेस्टइंडिज २-१ ने विजयी१९८८-८९ वेस्टइंडिज ५-० ने विजयी१९९६-९७ वेस्टइंडिज ३-१ ने विजयी२००२ भारत २-१ ने विजयी२००६ वेस्टइंडिज ४-१ ने विजयी२००९ भारत २-१ ने विजयी२०११ भारत ३-२ ने विजयी२०१७ भारत ३-१ ने विजयी२०१९ भारत २-० ने विजयी२०२२ भारत ३-० ने विजयी

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजशिखर धवनयुजवेंद्र चहलमोहम्मद सिराजशार्दुल ठाकूर
Open in App