Virat Kohli, IND vs WI, 3rd ODI Live Updates : ३ डाव, ८.६ सरासरी अन् २६ धावा; विराट कोहलीवर ८० महिन्यांनंतर प्रथमच ओढावली नामुष्की; अपयश काही केल्या पाठ सोडेना... 

India vs West Indies, 3rd ODI Live Updates : विराट कोहली ( Virat Kohli) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ७१वे शतक नेमकं कधी झळकावणार, या प्रश्नाचे उत्तर मागील अडीच वर्षांपासून सापडलेले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 02:53 PM2022-02-11T14:53:36+5:302022-02-11T14:54:07+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI, 3rd ODI Live Updates : It was the first time Virat Kohli failed to score a fifty in an ODI series since June 2015 | Virat Kohli, IND vs WI, 3rd ODI Live Updates : ३ डाव, ८.६ सरासरी अन् २६ धावा; विराट कोहलीवर ८० महिन्यांनंतर प्रथमच ओढावली नामुष्की; अपयश काही केल्या पाठ सोडेना... 

Virat Kohli, IND vs WI, 3rd ODI Live Updates : ३ डाव, ८.६ सरासरी अन् २६ धावा; विराट कोहलीवर ८० महिन्यांनंतर प्रथमच ओढावली नामुष्की; अपयश काही केल्या पाठ सोडेना... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies, 3rd ODI Live Updates : विराट कोहली ( Virat Kohli) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ७१वे शतक नेमकं कधी झळकावणार, या प्रश्नाचे उत्तर मागील अडीच वर्षांपासून सापडलेले नाही. किमान वेस्ट इंडिजसारख्या तुलनेने दुबळ्या संघाविरुद्धतरी घरच्या मैदानावर विराट हा दुष्काळ संपवेल ही आशा होती, परंतु ती फोल ठरली. तिसऱ्या वन डे सामन्यात विराटला भोपळाही फोडता आला नाही आणि २०१५ नंतर म्हणजेच जवळपास ८० महिन्यानंतर त्याच्यावर नकोशी नामुष्की ओढावली.आजच्या सामन्यात रोहित शर्मा व विराट कोहली यांना एकाच षटकात माघारी जावे लागले. या मालिकेत दुसऱ्यांदा हे दोन्ही फलंदाज एकाच षटकात माघारी जावं लागले आहे.  

भारतीय संघाने आजच्या सामन्यात शिखर धवन, दीपक चहर, कुलदीप यादव आणि श्रेयस अय्यर यांना खेळण्याची संधी दिली. त्यांच्यासाठी लोकेश राहुल, दीपक हुडा, युझवेंद्र चहल आणि शार्दूल ठाकूर यांना  विश्रांती दिली गेली आहे. शिखर धवन आणि रोहित ही जोडी बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा सलामीला खेळताना दिसली. पहिल्याच षटकात रोहितने चौकार खेचून दणक्यात सुरुवात केली. पण, चौथ्या षटकांत टीम इंडियाला दोन धक्के बसले. अल्झारी जोसेफने तिसऱ्या चेंडूवर रोहितचा ( १३) त्रिफळा उडवला आणि पाचव्या चेंडूवर विराट कोहली झेलबाद झाला. डाव्या बाजूने जाणारा चेंडू विराटने छेडण्याचा प्रयत्न केला आणि बॅटची किनार घेत तो यष्टीरक्षकाच्या हाती विसावला.  

विराट कोहलीला सलग ७व्या वन डे सामन्यांत शतक झळकावता आलेले नाही.  ( 2019 - WI Tour of IND, 2020 - AUS Tour of IND, 2020 - IND Tour of NZ, 2020 - IND Tour of AUS, 2021 - ENG Tour of IND, 2022 - IND Tour of SA, 2022 - WI Tour of IND*) भारतीय संघात वन डे क्रिकेटमध्ये १ ते ७ व्या क्रमांकावर सर्वाधिक भोपळ्यावर बाद होणाऱ्या फलंदाजांत विराट चौथ्या क्रमांकावर आला. तो १५ वेळा शून्यावर बाद झाला आणि त्याने सुरेश रैना व वीरेंद्र सेहवाग यांना मागे टाकले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १ ते ७व्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक भोपळ्यावर बाद होणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये विराट ( ३२) दुसऱ्या स्थानी सरकला आहे. सचिन तेंडुलकर सर्वाधिक ३४ वेळा शून्यावर बाद झाला आहे. ( Most Ducks for India) विराने वीरेंद्र सेहवागला ( ३१) आज मागे टाकले.

२०१५मध्ये विराटला वन डे मालिकेत एकही अर्धशतक झळकावता आले नव्हते आणि त्यानंतर २०२२मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत त्याला अर्धशतक झळकावता आलेले नाही. तीन सामन्यांत त्याने ८.६ च्या सरासरीने २६ धावा.  २०१४-१५ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर त्याला दोन सामन्यांत ३१ धावा करता आल्या होत्या. त्याआधी २०१२-१३मध्ये पाकिस्तानविरुद्ध घरच्या मैदानावर त्याने ३ सामन्यांत १३ धावा केल्या होत्या. 


 

Web Title: IND vs WI, 3rd ODI Live Updates : It was the first time Virat Kohli failed to score a fifty in an ODI series since June 2015

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.