Join us  

Mohammad Siraj, IND vs WI 3rd ODI Live Updates : मोहम्मद सिराजने ३ चेंडूंत दोन विकेट घेतल्या, वेस्ट इंडिजच्या आजीबाईंना खूपच दुःख झालं, Video Viral

India vs West Indies 3rd ODI Live Updates : पावसामुळे शुबमन गिलचे ( Shubman Gill) वन डेतील पहिले शतक पूर्ण होऊ शकले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 7:35 AM

Open in App

India vs West Indies 3rd ODI Live Updates : पावसामुळे शुबमन गिलचे ( Shubman Gill) वन डेतील पहिले शतक पूर्ण होऊ शकले नाही. गिलच्या ९८ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताला ३ बाद २२५ धावांवर खेळ थांबवावा लागला आणि वेस्ट इंडिजसमोर ३५ षटकांत २५७ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवले गेले. कर्णधार शिखर धवनने पहिले षटक दीपक हुडाला दिले आणि आशिया खंडाबाहेर वन डे क्रिकेटमध्ये दुसऱ्या डावात पहिले षटक फेकणारा हुडा हा पहिलाच भारतीय फिरकीपटू ठरला.  त्यानंतर मोहम्मद सिराजने ( Mohammad Siraj ) त्याच्या पहिल्या षटकात तीन चेंडूंत दोन फलंदाज बाद केले आणि वेस्ट इंडिजच्या फॅन आजीबाईंना मोठा धक्का बसला.  

शिखर धवन व शुबमन गिल या जोडीने भारतीय संघाला दमदार सुरूवात करून दिले. धवन ७४ चेंडूंत ७ चौकारांसह ५८ धावांवर बाद झाला आणि भारताला ११३ धावांवर पहिला धक्का बसला. पण, पावसामुळे हा सामना ४०-४० षटकांचा खेळवण्याचा निर्णय झाला. गिल व श्रेयस अय्यर यांनी ५८ चेंडूंत ८६ धावांची भागीदारी केली. श्रेयस ४४ ( ३४ चेंडू, ४ चौकार व १ षटकार) धावांवर झेलबाद झाला. सूर्यकुमार यादव ( ८)  लगेच माघारी परतला. ९७ धावांवर असताना गिलसाठी विंडीजच्या खेळाडूंनी LBW ची जोरदार अपील केले आणि त्यासाठी DRS ही घेतले. पण, त्याचा फार उपयोग झाला नाही. पण, पावसाने भारतीय चाहत्यांची प्रतीक्षा वाढवली. 

प्रथम पाऊस पडण्यापूर्वी गिलने ६५ चेंडूंत ५१ धावा केल्या होत्या, परंतु पावसाच्या बॅटींगनंतर गिलची आतषबाजी सुरू जाली. त्याने १६ चेंडूंत ३१ धावा चोपल्या. ८० धावांचा टप्पा ओलांडल्यावर पुढील १७ चेंडूंत त्याने १६ धावा केल्या.  ९८ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह गिल ९८ धावांवर नाबाद राहिला. प्रत्युत्तरात, दुसऱ्याच षटकात मोहम्मद सिराजने पहिल्या चेंडूवर कायले मेयर्सचा ( ०) त्रिफळा उडवला आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर शामराह ब्रुक्सला (०) पायचीत केले. सिराजच्या धक्क्यामुळे विंडीजची अवस्था २ बाद ० धावा अशी झाली होती. 

 

 

 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजमोहम्मद सिराजशुभमन गिल
Open in App