India vs West Indies 3rd ODI Live Updates : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातला तिसरा वन डे सामना आज खेळवला जात आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा सामना जिंकून कर्णधार शिखर धवन ( Shikhar Dhawan) याला इतिहास घडवण्याची संधी आहे. भारताच्या एकाही कर्णधाराला विंडीजविरुद्ध निर्भेळ यश मिळवता आलेले नाही. आजच्या सामन्यात रवींद्र जडेजाच्या ( Ravindra Jadeja) पुनरागमनाकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. वन डे मालिकेला सुरूवात होण्यापूर्वी त्याचा गुडघा दुखावला अन् तो सुरुवातीच्या दोन सामन्यांत खेळणार नसल्याचे BCCI ने स्पष्ट केले. पण, तिसऱ्या सामन्यातही त्याचे न खेळणे चाहत्यांची चिंता वाढवणारे ठरतेय.
भारतीय संघाने आजच्या सामन्यात आवेश खानला बाकावर बसवून प्रसिद्ध कृष्णाला पुन्हा संधी दिली आहे. अर्षदीप सिंगला ही मालिका बाकावर बसूनच पाहावी लागली आहे.
शिखर धवन व शुबमन गिल ही सलामीची जोडी कायम आहे. त्यानंतर श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, दीपक हुडा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल व प्रसिद्ध कृष्णा भारतीय संघ आहे. वेस्ट इंडिजच्या संघात अष्टपैलू जेसन होल्डर परतला आहे. कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे त्याला पहिल्या दोन सामन्यांना मुकावे लागले होते.
शिखर धवन काय म्हणाला, पहिल्या दोन्ही लढती हाय स्कोअरिंग झाल्या. आजही आम्हाला आव्हानात्मक धावसंख्या उभी करावी लागेल. प्रत्येक जण चांगली कामगिरी करतोय, ही आमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. खेळाडूंचे मानसिक स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी राहुल द्रविड चांगले काम करत आहेत. २०२३च्या वर्ल्ड कपची आमची तयारी जोरात सुरू आहे.
रवींद्र जडेजा अजूनही १०० टक्के तंदुरुस्त न झाल्यामुळे तो तिसऱ्या वन डे साठी उपलब्ध नाही,
बीसीसीआयची वैद्यकिय टीम त्याच्या तंदुरुस्तीवर लक्ष ठेऊन आहे, असे
बीसीसीआये ट्विट केले
Web Title: IND vs WI 3rd ODI Live Updates : Ravindra Jadeja was not available for selection for the 3rd ODI since he is still not 100 percent fit, Prasidh Krishna back in the playing XI, replaces Avesh Khan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.