Join us  

IND vs WI, 3rd ODI Live Updates : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं इतिहास घडवला; वेस्ट इंडिजला वन डे मालिकेत प्रथमच white-wash दिला

India vs West Indies, 3rd ODI Live Updates : रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) फुल टाईम नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिली वन डे मालिका जिंकली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 8:48 PM

Open in App

India vs West Indies, 3rd ODI Live Updates : रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) फुल टाईम नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिली वन डे मालिका जिंकली. भारताने ३-० अशा फरकाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत निर्भेळ यश मिळवले. श्रेयस अय्यर व रिषभ पंत यांनी भारताचा डाव सावरल्यानंतर दीपक चहर व वॉशिंग्टन सुंदर यांनी तळाला धावांत चांगले योगदान दिले. त्यानंतर गोलंदाजीतही चहरने कमाल केली. यावेळेत त्याला प्रसिद्ध कृष्णा व पुनरागमन करणारा कुलदीप यादव यांची चांगली साथ मिळाली. भारताने तिसरा वन डे सामने ९६ धावांनी जिंकला. प्रसिद्ध व मोहम्मद सिराजने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या, तर कुलदीप, दीपक चहर यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. भारतीय संघाने प्रथमच वेस्ट इंडिजवर वन डे मालिकेत निर्भेळ यश मिळवले. 

रिषभ पंत ( Rishabh Pant) व श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) यांनी भारताचा डाव सावरला. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाचा सामना करताना या जोडीनं ११० धावांची महत्त्वाची भागीदारी केली. त्यानंतर दीपक चहरने ( Deepak Chahar) तळाचा चांगली फटकेबाजी करून भारतासाठी धावांचा डोंगर उभा केला. वॉशिंग्टन सुंदरही चांगला खेळला. शिखर धवन आणि रोहित शर्मा ही जोडी बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा सलामीला खेळताना दिसली. अल्झारी जोसेफने  रोहितचा ( १३) त्रिफळा उडवला आणि विराट कोहलीला भोपळ्यावर माघारी पाठवले. त्यानंतर धवनही माघारी परतला. ३ बाद  ४२ धावा अशी अवस्थआ असताना रिषभ पंत व श्रेयस अय्यर यांनी दमदार खेळी करताना ११० धावांची भागीदारी केली. 

पंत ५४ चेंडूंत ६ चौकार व १ षटकार मारून ५६ धावांवर माघारी परतला. भारताची चौथी विकेट १५२ धावांवर पडली. चांगल्या फॉर्मात असलेला सूर्यकुमार यादव आज अपयशी ठरला, त्याला ६ धावांवर फॅबियन अॅलेनने बाद केले. श्रेयस १११ चेंडूंत ९ चौकारांच्या मदतीने ८० धावांवर बाद झाला. दीपक चहरने ३८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ३८ धावा करून माघारी परतला. वॉशिंग्टनने ३३ धावा केल्या आणि भारताला १० बाद २६५ धावांचा पल्ला गाठून दिला. 

प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजची सुरूवात निराशाजनक झाली. मोहम्मद सिराजने तिसऱ्याच षटकात शे होपला बाद केले. त्यानंतर दीपक चहरने विंडीजचे दोन फलंदाज बाद करताना त्यांची अवस्था ३ बाद २५ अशी केली. ब्रेंडन किंग्स ( १४) व शमर्ह ब्रुक्स ( ०) हे एकाच षटकात बाद झाले. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णाने अचूक मारा करताना निकोलस पूरन व डॅरेन ब्राव्हो ही सेट झालेली जोडी तोडली. प्रसिद्धने टाकलेल्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर ब्राव्होनं ( १९) हलका फटका मारला आणि स्लिपमध्ये उभ्य असलेल्या विराट कोहलीने तो सुरेखरित्या टिपला. जेसन होल्डरलाही ( ६) प्रसिद्धने तंबूत पाठवले. पुढील षटकात कुलदीप यादवने फॅबियन अॅलेनची ( ०) विकेट घेत विंडीजची अवस्था ६ बाद ७६ अशी केली.

कुलदीपने विंडीज कर्णधार निकोलसला ३४ धावांवर बाद करून भारताचा विजयाचा मार्ग आणखी सोपा बनवला. ओडीन स्मिथने फटकेबाजी करून चाहत्यांचे मनोरंजन केले. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादवने त्याला जीवदान दिले. पण, सिराजनेच ही विकेट मिळवली. स्मिथ १८ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ३६ धावांवर माघारी परतला.  इथे आता विंडीजचा पराभव निश्चित झाला होता आणि तळाचे फलंदाज विकेट टिकवून खेळताना दिसले. अल्झारी जोसेफ व हेडन वॉल्श यांनी खरंच भारतीय गोलंदाजांना विकेटसाठी तरसवले. त्यात प्रसिद्ध कृष्णाने २२ धावांवर जोसेफचा झेल सोडल्याने गोलंदाज सिराज भडकला. पण, सिराजनेच ही ४७ धावांची भागीदारी तोडली आणि  वॉल्श १३ धावांवर माघारी परतला. प्रसिद्धने अखेरची विकेट घेत विंडीजचा संघ १६९ धावांवर माघारी पाठवला.  

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्मा
Open in App