India vs West Indies 3rd ODI Live Updates : प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत वन डे संघात खेळण्याच्या मिळालेल्या संधीचं शुबमन गिलनं ( Shubman Gill) सोनं केलं. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत गिलने सातत्यपूर्ण कामगिरी केली. तिसऱ्या वन डे सामन्यात तर तो शतकाच्या उंबरठ्यावर आला होता, परंतु पावसाने घोळ घातला. ९८ धावांवर असताना पुन्हा पाऊस आला आणि सामना थांबवावा लागला आहे. आणखी काही काळ पाऊस असाच सुरू राहिला, तर भारताला ३ बाद २२५ धावांवरच डाव सोडावा लागेल. त्यामुळे गिलला ९८ धावांवरच समाधानी रहावे लागेल. वेस्ट इंडिजसमोर किती धावांचे लक्ष्य ठेवले जाईल ते पाहूयात...
शिखर धवन व शुबमन गिल या जोडीने भारतीय संघाला पुन्हा एकदा दमदार सुरूवात करून दिले. कर्णधार धवनने या मालिकेतील दुसरे अर्धशतक झळकावले, तर गिलनेही अर्धशतकी खेळी करून वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. धवन ७४ चेंडूंत ७ चौकारांसह ५८ धावांवर बाद झाला आणि भारताला ११३ धावांवर पहिला धक्का बसला. पण, पावसामुळे हा सामना जवळपास तास-दीड तास थांबवण्यात आला. आशिया खंडाबाहेर वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ५०+ धावा करणाऱ्या विक्रमात धवनने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या ( २९) विक्रमाशी बरोबरी केली. या विक्रमात विराट कोहली ( ४९), सचिन तेंडुलकर ( ४८), राहुल द्रविड (४२), सौरव गांगुली ( ३८) व रोहित शर्मा ( ३६) हे आघाडीवर आहेत.
पाऊस थांबल्यावर जर विंडीजला फलंदाजीला येण्यास सांगितले आणि षटकांची मर्यादा पुन्हा कमी केली, तर त्यांच्यासमोर किती धावांचे लक्ष्य असू शकतं?३६ षटकांत २६३ धावा३० षटकांत २३२ धावा२५ षटकांत २०५ धावा२० षटकांत १७५ धावा