Shubman Gill, IND vs WI 3rd ODI Live Updates : घात झाला! पावसामुळे शुबमन गिल ९८ धावांवर नाबाद राहिला, वन डेतील पहिल्या शतकाचे स्वप्न अधुरे

India vs West Indies 3rd ODI Live Updates : प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत वन डे संघात खेळण्याच्या मिळालेल्या संधीचं शुबमन गिलनं ( Shubman Gill) सोनं केलं. पण, पावसाला त्याचं यश पाहावलं नाही..

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 01:05 AM2022-07-28T01:05:14+5:302022-07-28T01:05:33+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI 3rd ODI Live Updates : West Indies need 257 in 35 overs to win the 3rd ODI, India innings end - Shubman Gill remains unbeaten on 98 | Shubman Gill, IND vs WI 3rd ODI Live Updates : घात झाला! पावसामुळे शुबमन गिल ९८ धावांवर नाबाद राहिला, वन डेतील पहिल्या शतकाचे स्वप्न अधुरे

Shubman Gill, IND vs WI 3rd ODI Live Updates : घात झाला! पावसामुळे शुबमन गिल ९८ धावांवर नाबाद राहिला, वन डेतील पहिल्या शतकाचे स्वप्न अधुरे

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies 3rd ODI Live Updates : प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत वन डे संघात खेळण्याच्या मिळालेल्या संधीचं शुबमन गिलनं ( Shubman Gill) सोनं केलं. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत गिलने सातत्यपूर्ण कामगिरी केली. तिसऱ्या वन डे सामन्यात तर तो शतकाच्या उंबरठ्यावर आला होता, परंतु पावसाने घोळ घातला. ९८ धावांवर असताना पुन्हा पाऊस आला आणि सामना थांबवावा लागला. त्यामुळे गिलचे वन डे तील पहिले शतक झळकावण्याचे स्वप्न अधुरे राहिले. काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक ९२ धावांवर खेळत असताना इंग्लंडविरुद्धचा वन डे सामना पावसामुळे रद्द करवा लागला. आज गिलच्या वाट्याला ते दुःख आले. 


शिखर धवन व शुबमन गिल या जोडीने भारतीय संघाला पुन्हा एकदा दमदार सुरूवात करून दिले. कर्णधार धवनने या मालिकेतील दुसरे अर्धशतक झळकावले, तर गिलनेही अर्धशतकी खेळी करून वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. धवन ७४ चेंडूंत ७ चौकारांसह ५८ धावांवर बाद झाला आणि भारताला ११३ धावांवर पहिला धक्का बसला. पण, पावसामुळे हा सामना जवळपास तास-दीड तास थांबवण्यात आला.  भारतीय वेळेनुसार ११.१५ वाजता पुन्हा सामना सुरू झाला आणि ४०-४० षटकांची सामना खेळवण्याचा निर्णय झाला.


त्यानंतर मैदानावर उतरलेल्या गिल व श्रेयस अय्यर यांनी पहिल्या दोन षटकांत ३१ धावा कुटल्या.  या दोघांनी ५८ चेंडूंत ८६ धावांची भागीदारी केली, ३३व्या षटकात अकिल होसैनच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात श्रेयस ४४ (  ३४ चेंडू, ४ चौकार व १ षटकार) धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर आलेला सूर्यकुमार यादव ( ८) वॉल्स ज्युनियरच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. ९७ धावांवर असताना गिलसाठी विंडीजच्या खेळाडूंनी LBW ची जोरदार अपील केले आणि त्यासाठी DRS ही घेतले. पण, त्याचा फार उपयोग झाला नाही. पण, पावसाने भारतीय चाहत्यांची प्रतीक्षा वाढवली. 


प्रथम पाऊस पडण्यापूर्वी गिलने ६५ चेंडूंत ५१ धावा केल्या होत्या, परंतु पावसाच्या बॅटींगनंतर गिलची आतषबाजी सुरू जाली. त्याने १६ चेंडूंत ३१ धावा चोपल्या. ८० धावांचा टप्पा ओलांडल्यावर पुढील १७ चेंडूंत त्याने १६ धावा केल्या.  ९८ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह गिल ९८ धावांवर नाबाद राहिला. वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ३५ षटकांत २५७ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.  

Web Title: IND vs WI 3rd ODI Live Updates : West Indies need 257 in 35 overs to win the 3rd ODI, India innings end - Shubman Gill remains unbeaten on 98

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.