Join us  

फायनल वन डेत खरी 'कसोटी', पाऊस 'बॅटिंग' करण्याची दाट शक्यता, पाहा weather updates

Tarouba Trinidad Weather Report, Brian Lara Cricket Academy : सध्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात वन डे मालिकेचा थरार रंगला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 2:00 PM

Open in App

IND vs WI 3rd ODI : सध्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात वन डे मालिकेचा थरार रंगला आहे. मंगळवारी या मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना होणार आहे. गुरूवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवून विजयी सलामी दिली होती. पण, शनिवारी झालेला सामना जिंकून यजमान संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. दुसऱ्या वन डेत वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यजमान संघाने सांघिक खेळी करत भारताला ४०.५ षटकांत १८१ धावांवर सर्वबाद केले. १८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विडिंजने ३६.४ षटकांत ४ बाद १८२ धावा करून विजय साकारला. लक्षणीय बाब म्हणजे फायनल वन डेमध्ये पाऊस बॅटिंग करण्याची दाट शक्यता आहे. 

दरम्यान, कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे भारताचे नुकसान झाले होते. कारण पराभवाच्या दिशेने कूच करणाऱ्या यजमान वेस्ट इंडिजच्या संघाला सामना अनिर्णित करण्यात यश आले. मंगळवारी होणाऱ्या सामन्यावर देखील पावसाचे सावट आहे. मालिकेतील अखेरचा वन डे सामना त्रिनिदाद येथे ब्रायन लारा क्रिकेट अकादमी या मैदानावर खेळवला जाणार आहे. 

Tarouba Trinidad Weather Forecastमंगळवारी सामन्याच्या ठिकाणी कमाल तापमान 34ºC सह ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. दक्षिण-पूर्वेकडून वारे १० ते १५ किमी/ताशी मंद गतीने वाहतील. जसजसा दिवस पुढे सरकेल तसतसा वातावरणात हवामान विभागाच्या अंदाजानुसार अपेक्षित बदल होत जाईल. रात्री देखील ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि किमान तापमान 25ºC च्या आसपास राहण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे पावसाची शक्यता २४ टक्के असली तरी उत्तरेकडील वाऱ्याची दिशा बदलली तर पाऊस येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

वन डे मालिकेसाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, उमरान मलिक, युझवेंद्र चहल, जयदेव उनाडकट, मुकेश कुमार, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, इशान किशन, ऋतुराज गायकवाड. 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजहवामानभारतीय क्रिकेट संघपाऊस
Open in App