पुणे, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : वेस्ट इंडिजचा संघ कच्चा लिंबू आहे, असं त्यांना भारतीय दौऱ्यावर येण्यापूर्वी हीणवलं जात होतं. भारत वेस्ट इंडिजवर निर्भेळ यश संपादन करेल, असे चाहत्यांना वाटले होते. पण तिसरा एकदिवसीय सामना जिंकत वेस्ट इंडिजने आपल्या टीकारारांना चोख उत्तर दिले आहे.
तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारतापुढे 284 धावांचे आव्हान ठेवले होते. या सामन्यात भारताला वेस्ट इंडिजने 43 धावांनी पराभूत केले होते. या सामन्यात अष्टपैलू कामगिरी केली होती ती अॅश्ले नर्सने. त्याने 40 धावांची तडफदार खेळी साकारली होती, त्याबरोबर गोलंदाजीमध्येही भरीव कामगिरी केली होती.
सामन्यानंतर नर्स म्हणाला की, "आम्ही जेव्हा दौऱ्यावर येत होतो तेव्हा बऱ्याच जणांनी आमच्यावर टीका केली होती. भारतासमोर तुम्ही सामने जिंकू शकत नाही, असेही म्हटले होते. पण एका विजयानंतर लोकांनी आम्हीला गंभीरपणे घ्यायला सुरुवात केली आहे. आम्ही काय चीज आहोत, हे त्यांना आता कळून चुकले आहे."