Join us  

IND Vs WI 3rd One Day : विराट कोहलीने केली एबीडीच्या विक्रमाची बरोबरी

विराटने विंडीजविरुद्धच्या पहिल्या दोन वन डे सामन्यांत अनुक्रमे 140 व 157 धावांची खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 8:28 PM

Open in App
ठळक मुद्देपुण्यातील सामन्यात विराटने धावांचा पाऊस पाडत शतकी खेळी साकारली आणि डीव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी केली.

पुणे, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने शतक झळकावत आणखी एका विक्रमाशी बरोबरी केली आहे.

 

विराटने विंडीजविरुद्धच्या पहिल्या दोन वन डे सामन्यांत अनुक्रमे 140 व 157 धावांची खेळी केली. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा सामना शनिवारी पुण्यात खेळवला जात आहे. भारताने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात कोहलीने 140 धावांच्या वैयक्तिक खेळीसह सलामीवीर रोहित शर्मासह 246 धावांची भागीदारी केली होती. दुसऱ्या सामन्यातही त्याने 157 धावा कुटल्या, परंतु शाय होपच्या नाबाद शतकामुळे विंडीजने सामना बरोबरीत सोडवला.

 

पुण्यातील सामन्यात विराटने धावांचा पाऊस पाडत शतकी खेळी साकारली आणि डीव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी केली. मायभूमीत सलग चार वन डे सामन्यात शतक करण्याचा विक्रम विराटच्या नावावर झाला आहे. या मालिकेपूर्वी विराटने ऑक्टोबर 2017 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर 113 धावा केल्या होत्या. डीव्हिलियर्सने 2010 आणि 2011 मध्ये सलग चार शतक झळकावली होती. 

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध वेस्ट इंडिज